Weather Update | राज्यात ‘या’ भागांमध्ये सोमवारपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली आहे. गेल्या 24 तासात राज्यातील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपीट झाली आहे. अशात पुढील दोन दिवस मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागांमध्ये विजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. तर मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये सोमवारपर्यंत पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

‘या’ भागांमध्ये सोमवारपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता (Chance of unseasonal rain in ‘these’ parts till Monday)

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार (Weather Update), रत्नागिरी, पालघर, धुळे, सिंधुदुर्ग, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड या जिल्ह्यांमध्ये सोमवारपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर हिंगोली, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दिल्ली, जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, गुजरात, उत्तराखंड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांमध्ये 20 मार्चपर्यंत विजांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात (Weather Update) आला आहे. या बदलत्या वातावरणाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे.

दरम्यान, राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. कुठे ढगाळ वातावरण आहे, तर कुठे उन्हाचा चटका जाणवत आहे. या बदलत्या हवामानाचा फटका शेतीतील पिकांना बसत आहे. या वातावरणाने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. राज्यातील शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाचा संकट घोंगावत आहे.

महत्वाच्या बातम्या

Back to top button