Weather Update | कमी दाबाचा पट्टा सक्रिय! राज्यात वादळी पावसाची शक्यता

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात अवकाळी पाऊस (Unseasonal rain) धुमाकूळ घालत आहे. तर, राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना गारपिटीने (Hail) झोडपलं आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत पुन्हा गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तर काही भागात पावसाचा येलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे.

राज्यामध्ये येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकण आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये वादळी पावसाचा इशारा (Weather Update) हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर, राज्यातील बहुतांश भागांमध्ये कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढवण्याची शक्यता देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यामध्ये दिवसभर उन्हाचा तडाखा आणि संध्याकाळी अचानक वादळी आणि गारपीटीचा पाऊस होत असल्याने नागरिकांचे हाल होतात दिसतं आहे.

‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता (Chance of rain at ‘this’ place)

मध्य महाराष्ट्रातील सांगली, नाशिक, धुळे, नंदुरबार, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड या भागातही हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात (Weather Update) आली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन देखील हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

राज्यामध्ये कमाल तापमानात वाढ होताना दिसत आहे. वर्धा, अमरावती, जळगाव, धुळे, ब्रह्मपुरी, चंद्रपूर या ठिकाणी तापमानाचा पारा 41 अंशावर होता. तर उर्वरित राज्यामध्ये कमाल तापमान 34 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान होते. अशा परिस्थितीत उन्हाचा चटका आणखीन वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात (Weather Update) आली आहे.

महत्वाच्या बातम्या

Back to top button