Walmik Karad । गेल्या आठवड्यात वाल्मिक कराड आणि पोलिस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ (Shitalkumar Ballal) यांच्यासोबतची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. अशातच आता पुन्हा एकदा वाल्मिक कराडची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.
यामध्ये वाल्मिक कराड एका महिला पोलिस कर्मचाऱ्याशी बोलत आहे. नाशिक येथील एका कार्यकर्त्याला बीड पोलिसांनी फोन केल्याने त्याने वाल्मिक कराड याच्याकडे मदत मागितली होती. यावर थेट कराडने महिला पोलिसाला फोन केला.
सायबर सेलच्या अधिकारी निशिगंधा खुळे यांच्यासोबत वाल्मिक कराड बोलत आहे. “किरकोळ गुन्हा आहे, पोरगा सोडून द्या. मी बीड जिल्ह्याचा बाप, मी असल्यावर चिंता नको,” असा सल्ला कराड याने खुळे यांना दिला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
Audio clip of walmik karad
दरम्यान, या कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने मकोका अंतर्गत कारवाई सुरु असलेल्या वाल्मिक कराडच्या अडचणी वाढू शकतात. विशेष म्हणजे दररोज त्याच्या अडचणीत भर पडत आहे. संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्याप्रकरणात कराड दोषी आढळतो का नाही? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :