Manoj Jarange । मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा अंतरवाली सराटीत मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे म्हणून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या आंदोलनाचा चौथा दिवस आहे. (Maratha Reservation Protest)
परंतु, आता त्यांचे आंदोलन कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे. कारण पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासह त्यांच्या समर्थकांना नोटीस बजावली आहे. यामागचं कारण आता समोर आलं आहे. उपोषणात सहभागी झालेल्या व्यक्तींची नावे, कोणत्या ठिकाणी उपोषणास कोण बसले आहे, आंदोलनकर्त्यांची माहिती दिली नाही. इतकेच नाही तर त्यांचे वैद्यकीय अहवालही दिले नाही, असे पोलिसांनी नोटिशीत म्हटले आहे.
यावर आता मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, त्यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. आजही ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
Manoj Jarange Patil protest for Maratha Reservation
दरम्यान, उपोषणामुळे मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली असल्याची माहिती समोर आली आहे. या उपोषणात मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे बंधु धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) सहभागी झाले आहेत. उपोषण मागे घेण्यासाठी सरकार मनोज जरांगेची मनधरणी करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या :