Share

राजीनामा देणार की नाही? Dhananjay Munde स्पष्टच म्हणाले; “देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार…”

Dhananjay Munde has commented on whether he will resign or not. His statement is currently being discussed in political circles.

by MHD

Published On: 

Dhananjay Munde statement on his resignation

🕒 1 min read

Dhananjay Munde । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्याप्रकरणात वाल्मिक कराड याचे नाव समोर आले आहे. कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी राजकीय वर्तुळातून होऊ लागली आहे.

कालच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली. जर अजित पवारांनी मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर आपण कोर्टात जाणार असल्याचा इशारा दिला आहे. अखेर आता यावर धनंजय मुंडे यांनी भाष्य केले आहे.

“राजीनाम्यावर मी काही बोलणार नाही. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उत्तर देतील आणि त्यांनीच उत्तर द्यावे अशी माझी सुद्धा इच्छा आहे. माझ्या राजीनाम्याची अजून कोणी मागणी केलेली नाही,” असे धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

पुढे ते म्हणाले की, “संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मी पहिल्या दिवसापासूनच मागणी करत आहे. माध्यमांमध्ये मागील एक महिन्यापासून बीडशिवाय दुसऱ्या बातम्या पाहायला मिळत नाही. देशमुख यांची हत्या ज्यांनी केली त्या मारेकऱ्यांना फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी होऊन फासावर न्यावे, अशी माझी भूमिका आहे आणि त्यात आजही बदल नाही,” असेही मुंडे म्हणाले.

Dhananjay Munde on his resignation

संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे याच्यावर आमदार संदीप क्षीरसागर यांनी भाष्य केले होते. यावरही मुंडेंनी प्रत्युत्तर दिले आहे. “ज्या अर्थी संदीप क्षीरसागर यांना सगळं माहिती आहे. त्याअर्थी त्यांचे आणि आरोपींचे संबंध असावेत. त्याशिवाय त्यांना इतकी माहिती मिळणार नाही,” असा दावा मुंडे यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!