Virat Kohli | विराट कोहली सोबत पंगा, तर दंगा होणारच; वाचा नेमके प्रकरण

Virat Kohli vs Naveen ul Haq Not Playing IPL 2024

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Virat Kohli | विराट कोहली सोबत पंगा घेणे नवीन उल हक ला चांगलेच त्रासदायक ठरले आहे. नवीन उल हक देशासाठी न खेळता स्वतःसाठी क्रिकेट खेळत असल्याचा ठपका अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने नवीन उल हक याच्यावर ठेवला आहे.

नवीन उल हकचा चिडका स्वभाव सर्वानी बंगळुरूत पाहिला आहे. विनाकारण विराट कोहली (Virat Kohli ) सोबत त्याने भांडण केले होते त्यात नंतर गौतम गंभीरने देखील उडी घेतली होती. या भांडणाची आयपीएलमध्ये खूप चर्चा रंगली होती. 1 मे 2023 ला लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चँलेंजर बंगळुरू सामन्यात हा भांडणाचा प्रकार घडला होता.

अफगाणिस्तान बोर्डाने 2024 वर्षासाठी नवीन उल हक (Naveen ul Haq) सोबत वार्षिक करार करण्यास नकार दिला आहे. तसेच पुढच्या दोन वर्षात नवीन उल हकला ना हरकत प्रमाणपत्र ( NOC ) न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता नवीनला आयपीएल 2024  मधेही खेळाता येणार नाही आहे. कारण आयपीएलमध्ये खेळण्यासाठी देशातील क्रिकेट बोर्डाची NOC गरजेची आहे.

नवीन उल हक सोबत मुजीब उर रहमान, फजलहक फारुकी यांनाही अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने ना हरकत प्रमाणपत्र ( NOC ) न देण्याचा निर्णय घेतला आहे. तीन खेळाडूंना एनओसी मिळाली नाही तर फ्रेंचायसीला धक्का बसणार आहे. यात कोलकाता, हैदराबद आणि लखनऊचा समावेश आहे.

मुजीब उर रहमान कोलकाता नाइट रायडर्सकडून, फजलहक फारुकी सनरायजर्स हैदराबादकडून, तर नवीन उल हक लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळणार आहेत. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने या तिघांना 1 जानेवारी 2024 पासून वार्षिक करारातून मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

ODI वर्ल्डकप स्पर्धेत अफगाणिस्तानकडून हे तिन्ही खेळाडू खेळले होते. या स्पर्धेत अफगाणिस्तानची कामगिरी चांगली राहिली होती. अफगाणिस्तानने 9 पैकी 5 सामने जिंकले होते. यात इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंकेसारख्या दिग्गज संघांचा पराभव त्यांनी केला होता. तसेच उपांत्य फेरीच्या रेसमध्येही संघ होता.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका जानेवारीत होणार आहे. 11 जानेवारीला मोहालीत, 14 जानेवारील इंदुरला आणि 17 जानेवारीला बंगळुरुत आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या T20I मालिकेसाठी रोहित शर्मा कर्णधार असणार आहे. सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या (Hardik Pandya ) दुखापतीमुळे अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार नाही आहे.

विराट कोहली ( Virat Kohli ) आणि जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah ) देखील T20I विश्वचषकापूर्वी भारताच्या शेवटच्या T20I मालिकेसाठी पुनरागमन करतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

India Vs Afghanistan T20I 2024 Schedule ( IND Vs AFG T20I )

India Vs Afghanistan T20I Match Timings & Live Streaming Details

भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी-20 मालिका 11 जानेवारी 2024 पासून सुरू होईल.

भारत विरुद्ध अफगाणिस्तान T20 सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल.

भारत विरुद्ध अफगाणिस्तान T20 सामने JioCinema वर तुम्ही लाईव्ह ( Live ) पाहू शकाल.

महत्वाच्या बातम्या