IPL 2024 | हार्दिक पांड्यासाठी अंबानीने १०० कोटी रुपये गुजरात टायटन्सला दिले

Ambani paid Rs 100 crore to Gujarat Titans for Hardik Pandya

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IPL 2024 |  आयपीएल २०२४ स्पर्धेपूर्वी  मुंबई इंडियन्सने  (MI) संघात मोठे फेरबदल केले आहेत. IPL 2024 सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला आपल्या संघात सामील करुन कर्णधार पद दिले.

हार्दिकला कर्णधार केल्याने मुंबई इंडियन्सने फॅन्स नाराज झाले होते. फॅन्सने मुंबई इंडियन्सची ( Mumbai Indians ) जर्सी जाळत निषेध नोंदवला होता. काही दिवसांपूर्वी हार्दिक पंड्या गुजरातची टीम सोडून पुन्हा मुंबई इंडियन्सकडे परत आला आहे.

दरम्यान, मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला संघात घेण्यासाठी गुजरात टायटन्सला १०० कोटी रुपये दिले आहे. हार्दिक पंड्या २०१५ ते २०२१ मुंबई इंडियन्सकडून खेळत होता. हार्दिकने गुजरातला 2022 मध्ये पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली होती.

आयपीएल 2024 लिलावाच्या आधी मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला 15 कोटी रुपयांमध्ये गुजरात टायटन्स कडून ट्रेंड केले होते. रोहित शर्माच्या जागी पंड्याला मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणूनही नियुक्त करण्यात आले आहे.

परंतु, इंडियन एक्स्प्रेसने दावा केला आहे कि मुंबई इंडियन्सने गुजरातला १०० कोटी पेक्षा जास्त रक्कम दिली आहे.  या बातमीने आयपीएल मध्ये किती मोठी पैशाची उलाढाल होत असेल याचा अंदाज आला असेल.

गुजरात टायटन्सची मालकी CVC कॅपिटल्सची आहे ज्यांनी BCCI ला 10 वर्षे IPL चा भाग होण्यासाठी 5625 कोटी रुपये दिले आहेत.

IPL Auction 2024 मध्ये गुजरात टायटन्सने खरेदी केलेले खेळाडू

  1. अजमतुल्ला उमरझाई  – 50 लाख
  2. उमेश यादव – 5.80 कोटी
  3. शाहरुख खान – 7.40 कोटी
  4. सुशांत मिश्रा – 2.20 कोटी
  5. कार्तिक त्यागी  -60 लाख
  6. मानव सुथार-20 लाख रुपये
  7. स्पेन्सर जॉन्सन -10 कोटी
  8. रॉबिन मिन्झ -3.60 कोटी

Gujarat Titans Full Squad For IPL 2024

IPL 2024 साठी गुजरात टायटन्स संघ

डेव्हिड मिलर, शुभमन गिल (c), मॅथ्यू वेड, वृद्धिमान साहा, केन विल्यमसन, अभिनव मनोहर, बी. साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, विजय शंकर, जयंत यादव, राहुल तेवतिया, मोहम्मद शमी, नूर अहमद, साई किशोर, रशीद खान, जोशुआ लिटल, मोहित शर्मा, अजमतुल्ला ओमरझाई, उमेश यादव, शाहरुख खान, सुशांत मिश्रा, कार्तिक त्यागी, मानव सुथार, स्पेन्सर जॉन्सन, रॉबिन मिन्झ.

हे वाचा – IPL 2024 Schedule – सामन्यांच्या तारखा, ठिकाण, संघांची यादी, कर्णधार, संघ मालक आणि वेळ, आयपीएलबाबत सर्व माहिती

महत्वाच्या बातम्या