IPL 2024 । विराट कोहलीच्या RCB मध्ये असणार ‘हे’ दिग्गज खेळाडू; वाचा RCB ची Playing 11

IPL 2024 Royal Challengers Bangalore Playing 11

 IPL 2024 लिलाव 19 डिसेंबर रोजी झाला. फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघ खेळणार आहे.

अल्झारी जोसेफला RCB मध्ये सर्वात जास्त किंमत मिळाली आहे. जोसेफला ११.५ कोटी रुपये रक्कम देण्यात आली आहे. वेस्ट इंडिजच्या अल्झारी जोसेफ सोबत टॉम करन, लॉकी फर्ग्युसन आणि यश दयाल हे  तीन वेगवान गोलंदाज आहेत.

याशिवाय, RCB  ने डावखुरा फिरकी गोलंदाज स्वप्नील सिंग आणि गुजरातचा आघाडीचा फलंदाज सौरव चौहान यांचाही समावेश संघात केला आहे.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सला RCB संघात घेण्यास उत्सुक होते मात्र RCB  त्याला संघात घेण्यास कमी पडले.  कमिन्सला सनरायझर्स हैदराबादमध्ये २०.५० कोटी रुपयांमध्ये संघात घेतले आहे.

IPL 2024 Royal Challengers Bangalore Playing 11

1. विराट कोहली: आयपीएल मध्ये सर्वाधिक धावा करणारा विराट कोहली RCB च्या डावाची सुरुवात करेल.

2. फाफ डू प्लेसिस (सी): फाफ डू प्लेसिस आरसीबीचे नेतृत्व करणार आहे.

3. रजत पाटीदार: दुखापतीमुळे IPL 2023 रजत खेळला नव्हता, या वर्षी मात्र तो पुनरागमन करणार आहे.

4. कॅमेरॉन ग्रीन: आक्रमक फलंदाजी आणि गोलंदाजीचे कौशल्य असलेल्या कॅमेरॉन ग्रीनला मुंबई कडून संघात घेतले आहे.

5. ग्लेन मॅक्सवेल: ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल मधल्या फळीतील उत्कृष्ट फलंदाज आहे.

6. दिनेश कार्तिक (WK):  अनुभवी दिनेश कार्तिक 2024 मध्ये RCB साठी विकेटकीपिंग करतांना दिसणार आहे.

7. मयंक डागर: फिरकी गोलंदाज मयंक डागर

8. अल्झारी जोसेफ: अल्झारी जोसेफला RCB  मध्ये सर्वात जास्त रक्कम मिळाली आहे. जोसेफला ११.५ कोटी रुपये रक्कम देण्यात आली आहे.

9. मोहम्मद सिराज: २०१८ पासून RCB साठी सिराज सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. सिराज बेंगळुरूच्या वेगवान  गोलंदाजीचा मुख्य भाग असणार आहे.

10. यश दयाल: वेगवान गोलंदाज यश दयालला  आरसीबीने ५ कोटी रुपयांना खरेदी केले आहे.

11. विजयकुमार विशक: विजयकुमार उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाज आहे.

Impact Players:  : अनुज रावत (यष्टीरक्षक-फलंदाज), कर्ण शर्मा (स्पिनर) आणि आकाश दीप (वेगवान)

Backups : रीस टोपली, लॉकी फर्ग्युसन आणि टॉम करन हे अल्झारी जोसेफसाठी बॅकअप म्हणूनअसतील, तर विल जॅक्स हा IPL 2024 साठी RCB संघात ग्लेन मॅक्सवेलसाठी बॅकअप म्हणून असेल.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.