Rohit Sharma | रोहित शर्मावर अन्याय का झाला? खरं कारण आले समोर

Why Mumbai Indians replaced Rohit Sharma as captain?

Rohit Sharma | मुंबई इंडियन्सने  (MI) संघात मोठे फेरबदल केले आहेत. आयपीएल २०२४ स्पर्धेचा हंगाम सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला आपल्या संघात सामील करुन कर्णधार पद दिले.

हार्दिकला कर्णधार केल्याने मुंबई इंडियन्सने फॅन्स नाराज झाले होते. फॅन्सने मुंबई इंडियन्सची ( Mumbai Indians ) जर्सी जाळत निषेध नोंदवला होता. काही दिवसांपूर्वी हार्दिक पंड्या गुजरातची टीम सोडून पुन्हा मुंबई इंडियन्सकडे परत आला आहे.

मुंबई इंडियन्स फ्रेंचायझिंने रोहित शर्मावरच नाहीतर संघातील इतर खेळाडूंवरही अन्याय केला आहे. कर्णधारच बदल्याचा होता तर फ्रेंचायझिंकडे धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव तसेच गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांचा पर्याय होता.

हार्दिक ऐवजी सूर्यकुमार यादव किंवा जसप्रीत बुमराहचा कर्णधार म्हणून चाहत्यांनी मोठ्या मनाने स्वीकार केला असता. संघातील खेळाडूंना सोडून गुजरात संघातील हार्दिक पंड्याला कर्णधार केल्याने चाहते भडकले आहेत.

Rohit Sharma IPL Stats Vs Hardik Pandya IPL Stats

रोहितने २४३ सामन्यात ६२११ धावा केल्या आहेत. त्यात एक शतक, ४२ अर्धशतके, ५५४ चौकार आणि २५७ षटकार आहेत. रोहितने IPL मध्ये १५ विकेट घेतल्या आहेत.

हार्दिकने १२३ सामन्यात २३०९ धावा केल्या आहेत. त्यात शून्य शतक, १० अर्धशतके, १७२ चौकार आणि १२५ षटकार आहेत. गोलंदाजीमध्ये हि हार्दिकने मोठी कामगिरी केलेली नाही आहे. त्याने १२३ सामन्यात ५३ विकेट घेतल्या आहेत.

आकड्यावरून लक्षात येते रोहित शर्माची ( Rohit Sharma ) कामगिरी हार्दिक पंड्या पेक्षा चांगली आहे.

रोहित शर्मा मुंबईचा सर्वात यशस्वी कर्णधार 

रोहित 2011 पासून मुंबई इंडियन्स संघासाठी खेळतो आहे. तसेच 2013 पासून तो संघाचा कर्णधार आहे. रोहितच्या नेतृत्वात मुंबईने २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये विजेतेपद पटकावलं आहे.

रोहितने १६३ सामन्यांमध्ये MI चे नेतृत्व करताना ९१ सामन्यात विजय मिळवला आहे. तर ६८ सामने गमावले असून ४ सामने बरोबरीत सुटले आहेत.

रोहित शर्माचा ( Rohit Sharma ) विश्वचषकातील फॉर्म बघता आणि IPL मधील कामगिरी बघता रोहित शिवाय दुसरा कर्णधार असू शकणार नव्हता. हार्दिकला कर्णधार पद द्यायला नको होते हे आकड्यांवरून स्पष्ट होते.

हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय लवकर

हार्दिकला कर्णधार केल्याने मुंबईवर टीका होत आहे यावर महेला जयवर्धने प्रतिक्रिया दिली आहे. जयवर्धने म्हणाला कि, ”चाहत्यांच्या भावनेचा आम्ही आदर करतो, हा एक कठीण निर्णय होता. प्रामाणिकपणे सांगायचे तर प्रत्येकजण भावनिक आहे आणि आपण त्याचा आदर करतो.”

जयवर्धनेने चाहत्यांना आश्वासन दिले की, रोहित शर्मा मैदानावर आणि मैदानाबाहेरही संघात महत्त्वाची भूमिका बजावत राहील. पुढील पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी रोहितचा संघात, मैदानावर आणि मैदानाबाहेर असणे आमच्यासाठी खूप महत्वाचे आहे.”

हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय लवकर झाल्याचा जयवर्धनेने स्पष्ट केले. जयवर्धनेला ही हार्दिकला कर्णधार केल्याचे आवडलेले दिसत नाही आहे. परंतु हा निर्णय आम्हाला कधीतरी घ्यावा लागला असता, असे खरं कारण जयवर्धनेने सांगितले.

महत्वाच्या बातम्या

 

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.