Rohit Sharma | रोहित शर्मा पुन्हा होणार मुंबई इंडियन्सचा कर्णधार!

Rohit Sharma Mumbai Indians Captain Again

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rohit Sharma | आयपीएल २०२४ स्पर्धेचा हंगाम सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला आपल्या संघात सामील करुन कर्णधार पद दिले. हार्दिकला कर्णधार केल्याने मुंबई इंडियन्सने फॅन्स नाराज झाले होते. काही दिवसांपूर्वी हार्दिक पंड्या गुजरातची टीम सोडून पुन्हा मुंबई इंडियन्सकडे आला होता..

हार्दिक पंड्या ऐवजी सूर्यकुमारला मुंबई इंडियन्सने ( Mumbai Indians ) कर्णधारपद द्यायला हवे होते. हार्दिक हा संघ सोडून गेला होता. या कारणाने त्याला द्यायला नको होते. असेही चाहते म्हणत होते.

दरम्यान, रोहित शर्मा (Rohit Sharma) पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनण्याची शक्यता आहे. कारण आयसीसी वर्ल्डकपदरम्यान हार्दिकच्या (Hardik Pandya) टाचेला दुखापत झाली होती, तेव्हापासून तो मैदानाबाहेर आहे. त्याची फिटनेसवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

रोहित शर्मा कर्णधार होणार असल्याने मुंबई इंडियन्सचे चाहते आनंदी झाले आहेत. त्यांनी पेढे वाटत आपला आनंद साजरा केला आहे.

हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) मुंबईने गुजरातसोबत केलेल्या ट्रेडअंतर्गत 15 कोटी रुपयांना विकत घेतलं होते.

रोहित शर्माच्या आयपीएल करिअरबाबत बोलायचं झाल्यास तो मुंबईचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे.

2011 पासून रोहित मुंबई इंडियन्स संघासाठी खेळतो आहे. तो मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) बॅटिंग लाईनअपचा एक महत्त्वाचा भाग आहे. तसेच 2013 पासून तो संघाचा कर्णधार आहे.

रोहितच्या नेतृत्वात मुंबईने २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये विजेतेपद पटकावलं आहे. रोहितने १६३ सामन्यांमध्ये MI चे नेतृत्व करताना ९१ सामन्यात विजय मिळवला आहे. तर ६८ सामने गमावले असून ४ सामने बरोबरीत सुटले आहेत.

Rohit Sharma T20i Stats

रोहित शर्माने १४८ टी-20 सामन्यात १३९.२५ च्या स्ट्राइक रेट ३८५३ धावा केल्या आहेत. त्यात ४ शतके आणि २९ अर्धशतकांचा समावेश आहे.

रोहितने आतापर्यन्त ३४८ चौकार आणि १८२ षटकार मारले आहेत, तर ११८ धावा हि रोहितची टी-20 सामन्यातील सर्वाधिक धावसंख्या आहे.

महत्वाच्या बातम्या