Rohit Sharma | रोहित शर्माच्या नेतृत्वात असा असणार मुंबईचा बलाढय संघ; वाचा खेळाडूंची यादी

Mumbai Indians' Strongest Playing 11 For IPL 2024 Season

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rohit Sharma | रोहित शर्मा पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनण्याची शक्यता आहे. कारण आयसीसी वर्ल्डकपदरम्यान हार्दिकच्या (Hardik Pandya) टाचेला दुखापत झाली होती, तेव्हापासून तो मैदानाबाहेर आहे. त्याची फिटनेसवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मुंबई इंडियन्सकडे रोहित शर्मा (Rohit Sharma ), जसप्रीत बुमराह, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव  हे दिग्गज खेळाडू होते. काही दिवसांपूर्वी हार्दिक पंड्या (Hardik Pandya)  गुजरातची टीम सोडून पुन्हा मुंबई इंडियन्सकडे आला आहे. हार्दिकला मुंबई इंडियन्सचे कर्णधार पद देण्यात आले होते परंतु  त्याची फिटनेस चांगली नसल्याने तो खेळणार नसल्याचे बोलले जात आहे.

रोहित शर्मा कर्णधार होणार असल्याने मुंबई इंडियन्सच्या फॅन्समध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. रोहित पुन्हा कर्णधार झाल्याने चाहत्यांनी पेढे वाटत आपला आनंद साजरा केला आहे.

रोहित (Rohit Sharma ) कर्णधार होणार असल्याने संघातील खेळाडू हि आनंदी झाले आहे. काही दिवसापूर्वी सूर्यकुमार यादवने ( Suryakumar Yadav ) ट्विटवर एक हृदय तुटलेले इमोजी शेअर करत आपली नाराजी व्यक्त केली होती. हार्दिकला कर्णधार केल्याने मुंबई इंडियन्सचे फॅन्सही नाराज झाले होते.

Mumbai Indians’ Strongest Playing 11 For IPL 2024 Season

IPL 2024 साठी मुंबईच्या बलाढय संघातील खेळाडूंची नावे –

  1. रोहित शर्मा
  2. इशान किशन (WK)
  3.  टिळक वर्मा
  4. सूर्यकुमार यादव
  5. मोहम्मद नबी
  6. टिम डेव्हिड
  7. जेराल्ड कोएत्झी
  8.  पियुष चावला
  9.  जसप्रीत बुमराह
  10. दिलशान मधुशंका

याव्यतिरिक्त मुंबई इंडियन्सकडे आकाश मधवाल, नेहल वढेरा, विष्णू विनोद, श्रेयस गोपाल, कुमार कार्तिकेय आणि अर्जुन तेंडुलकर यांसारखे खेळाडू आहेत. मुंबई संघाकडे डेवाल्ड ब्रेविस, जेसन बेहरेनडॉर्फ आणि रोमॅरियो शेफर्ड यांचा देखील बॅकअप आहे.

महत्वाच्या बातम्या