ODI Match Fees | रोहित-विराट नाही तर ‘या’ खेळांडूने केली 2023 मध्ये सर्वाधिक कमाई

Meet The Highest-Earning Indian Player Through ODI Match Fees In 2023

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

ODI Match Fees | एकदिवसीय क्रिकेटसाठी हे वर्ष महत्त्वाचे होते, कारण विश्वचषक 2023 ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात झाला. भारताने २०२३ मध्ये ३५ सामने खेळले आहे त्यापैकी २७ सामने भारताने जिकंले आहेत. वेगवेगळ्या संघाबरोबर झालेल्या 8  मालिकांपैकी ७ मालिका भारताने जिंकल्या आहेत.

भारतीय संघाने विश्वचषकातही उत्तम कामगिरी करत सलग ११ सामन्यात विजय मिळवला होता. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला. विश्वविजेता बनण्याचे भारताचे स्वप्न पूर्ण झाले नाही.

२०२३ वर्ष भारतीय क्रिकेटसाठी खूप चांगले होते आणि यामुळे भारतीय क्रिकेटपटूंचीही मोठी कमाई झाली आहे. विराट कोहली ( Virat Kohli ) आणि कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) या दोघांनाही एकदिवसीय क्रिकेटमध्ये मॅच फीच्या बाबतीत मागे टाकत डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने १.८ कोटी रुपये कमावले. भारतीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू म्हणून कुलदीपला स्थान मिळाले आहे.

भारतीय क्रिकेटपटू एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रति सामन्यात 6 लाख रुपये कमावतात. डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने ( Kuldeep Yadav ) एकूण 30 सामने खेळले. त्यामुळे त्याने २०२३ मध्ये एकूण १.८ कोटी रुपये कमावले, जे या वर्षातील सर्व भारतीय क्रिकेटपटूंपैकी सर्वात जास्त आहे.

कुलदीप यादवने त्याच्या ३० सामन्यांमध्ये ४९ बळी घेतले आणि २०२३ मधील एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज म्हणून इतिहास नोंदवला.

शुभमन गिल ( Shubman Gill ) २०२३ मध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे, शुभमनने २९ सामने खेळले आणि १.७४ कोटी रुपये कमावले आहेत . जे भारतीयाकडून दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च आहे.

रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल यांनी २७ सामने खेळले आणि २०२३ मध्ये वनडे मॅच फीमधून १.६२  कोटी रुपये कमावले आहेत.

10 highest-earning Indian cricketers based on ODI match fees

एकदिवसीय सामन्यातून सर्वाधिक कमाई करणारे 10 भारतीय क्रिकेटपटू

कुलदीप यादव – १.८ कोटी रु

शुभमन गिल- १.७४ कोटी रु

रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल- १.६२ कोटी

रवींद्र जडेजा- १.५६ कोटी रु

मोहम्मद सिराज- १.५ कोटी रु

सूर्यकुमार यादव- १.२६ कोटी रु

श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या- १.२० कोटी रु

महत्वाच्या बातम्या