Share

Rohit Sharma | दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असणाऱ्या रोहित शर्मा साठी आनंदाची बातमी

Good News For Rohit Sharma | Virat Kohli returns to Indian squad for South Africa Test series | virat Kohli rejoins team India ahead of first Test against South Africa | Virat Kohli returns home due to family emergency | India Vs South Africa 1st Test Probable Playing 11s: Virat Kohli Returns |

Published On: 

🕒 1 min read

Rohit Sharma | भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. दक्षिण आफ्रिके ( IND Vs SA Test Series ) विरुद्ध भारत टेस्ट सीरीजला  26  डिसेंबर म्हणजे उद्यापासून सुरवात होणार आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाचा पहिला कसोटी सामना २६ ते ३० डिसेंबर या कालावधीत सेंच्युरियन येथे तर दुसरा कसोटी सामना ३ ते ७ जानेवारीपासून केपटाऊन येथे खेळला जाणार आहे.

भारताने तीन सामन्यांची टी20 मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली. तर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका टीम इंडियाने 2-1 अशी जिंकत इतिहास रचला. आता दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेत एकही टेस्ट सीरीज जिंकलेली नाही.

दरम्यान, विराट कोहली (Virat Kohli) कौटुंबिक इमर्जन्सीमुळे भारतात आला होता. विराटच्या माघारी येण्याने टीम इंडियाला मोठा धक्का बसला होता. कारण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विराटने 51 पेक्षा जास्त सरासरीने 719 धावा केल्यात. यात दोन शतक आहेत.

रोहित शर्मा आणि क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी अशी कि, विराट कोहली सेंच्युरियन येथे होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळणार आहे. विराट कोहलीचा फॉर्म बघता भारत दक्षिण आफ्रिकेत या वेळी इतिहास रचेल अशी अपेक्षा आहे.

रोहित- विराट ची जोडी कसोटी मध्ये काय कमाल करणार, याकडे आता क्रिकेट प्रेमीं लक्ष लावून बसले आहे. उद्या 26  डिसेंबरला पहिला कसोटी सामना सेंच्युरियन येथे होईल. भारतात हा कसोटी सामना दुपारी १.३० pm नंतर तुम्ही पाहू शकाल.

IND Vs SA Test Series Squads

भारताचा कसोटी संघ :  रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, शुभमन गिल, यशस्वी जायसवाल, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिद्ध कृष्णा.

दक्षिण आफ्रिका कसोटी संघ : टेम्बा बावुमा (C), डेव्हिड बेडिंगहॅम, नांद्रे बर्गर, जेराल्ड कोएत्झी, टोनी डी झोर्झी, डीन एल्गर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, एडन मार्कराम, विआन मुल्डर, लुंगी एनगिडी, कीगन पीटरसन, कागिसो रबाडा, ट्रिस्टन स्टब्स आणि काइल वेरेन

India Vs South Africa: Test Series Schedule

पहिला कसोटी सामना 26 ते 30 डिसेंबरला सेंच्युरियन येथे तर दुसरा कसोटी सामना 3 ते 7  जानेवारीत केपटाऊन येथे खेळला जाणार आहे.

India Vs South Africa Test Series Live Streaming Details 

स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यांचे भारतात थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. तसेच Disney+Hotstar अॅप आणि वेबसाइटवर IND Vs SA Test Series सामन्यांचे  Live Streaming तुम्ही पाहू शकाल.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही