Banana | त्वचा मुलायम आणि चमकदार बनवण्यासाठी केळीचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Banana | टीम महाराष्ट्र देशा: केळी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. त्याचबरोबर केळी आपल्या त्वचेची काळजी (Skin Care) घेण्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकते. केळीमध्ये आढळणारे गुणधर्म त्वचेची काळजी घेण्यास मदत करतात. केळीच्या मदतीने त्वचेवरील सुरकुत्या, बारीक रेषा, वृद्धत्वाची लक्षणे इत्यादी समस्या दूर होऊ शकतात. त्याचबरोबर त्वचेला मुलायम आणि चमकदार बनवण्यासाठी केळी मदत करू शकते. त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही खालील पद्धतीने केळीचा वापर करू शकतात.

मध आणि केळी (Honey & Banana-For Skin Care)

त्वचेची काळजी घेण्यासाठी केळी आणि मध उपयुक्त ठरू शकतो. यासाठी तुम्हाला एक केळी बारीक करून त्यामध्ये एक चमचा मध मिसळून घ्यावे लागेल. त्यानंतर हे मिश्रण तुम्हाला साधारण वीस ते पंचवीस मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. केळी आणि मधाच्या मिश्रणाने त्वचा मुलायम होण्यास मदत होते.

दही आणि केळी (Curd & Banana-For Skin Care)

चेहऱ्यावरील सुरकुत्या, बारीक रेषा आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यासाठी केळी आणि दह्याचे मिश्रण उपयुक्त ठरू शकते. दही आणि केळी चेहऱ्याला लावल्याने त्वचा फ्री रॅडिकल्सपासून सुरक्षित राहू शकते. यासाठी तुम्हाला एक केळी बारीक करून त्यामध्ये एक चमचा दही मिसळून घ्यावे लागेल. हे मिश्रण आठवड्यातून दोन वेळा वापरल्याने तुमच्या चेहऱ्याला अनेक फायदे मिळू शकतात.

बेसन आणि केळी (Besan & Banana-For Skin Care)

त्वचेची काळजी घेण्यासाठी बेसन आणि केळी मदत करू शकते. यासाठी तुम्हाला एक केळी बारीक करून त्यामध्ये दोन चमचे बेसन आणि काही थेंब लिंबाचा रस मिसळून घ्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला हे मिश्रण साधारण पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. पंधरा मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. नियमित या मिश्रणाचा वापर केल्याने त्वचेवरील काळे डाग, सुरकुत्या इत्यादी समस्या सहज दूर होऊ शकतात.

त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही केळीच्या वरील पद्धतीने वापर करू शकतात. त्याचबरोबर चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी तुम्ही खालील पद्धतीने बेकिंग सोड्याचा वापर करू शकतात.

बेकिंग सोडा आणि मध (Baking soda and honey-For Blackheads)

चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी बेकिंग सोडा आणि मध उपयुक्त ठरू शकतो. या दोन्हीमध्ये आढळणारे गुणधर्म त्वचेला खोलवर स्वच्छ करू शकतात. यासाठी तुम्हाला एक चमचा मधामध्ये एक चमचा बेकिंग सोडा मिसळून घ्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला ही पेस्ट ब्लॅकहेड्सवर लावावी लागेल. साधारण पंधरा मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा लागेल. आठवड्यातून तीन वेळा या मिश्रणाचा वापर केल्याने चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स दूर होऊ शकतात.

बेकिंग सोडा आणि लिंबू (Baking soda and lemon-For Blackheads)

बेकिंग सोडा आणि लिंबाचा वापर करून देखील चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स दूर करता येऊ शकतात. यासाठी तुम्हाला एक चमचा बेकिंग सोड्यामध्ये काही थेंब लिंबाचा रस मिसळून पेस्ट तयार करून घ्यावी लागेल. ही पेस्ट तुम्हाला साधारण 15 मिनिट ब्लॅकहेड्सवर लावून ठेवावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. आठवड्यातून तीन वेळा या मिश्रणाचा वापर केल्याने चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स दूर होऊ शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या