Share

ISRO Recruitment | इस्रोमध्ये ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू

🕒 1 min read ISRO Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी इस्रो मोठी संधी उपलब्ध करून देत आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO), नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर (NRSC) यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर जाहिरातीमध्ये … Read more

Published On: 

🕒 1 min read

ISRO Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी इस्रो मोठी संधी उपलब्ध करून देत आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO), नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर (NRSC) यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO Recruitment) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या 34 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती मोहीम आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये ज्युनियर रिसर्च फेलो (JRF), रिसर्च सायंटिस्ट (RS), प्रोजेक्ट असोसिएट-I आणि प्रोजेक्ट सायंटिस्ट-I पदांचा रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (ISRO Recruitment) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (ISRO Recruitment) इच्छुक उमेदवारांना दिनांक 7 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

अधिकृत वेबसाईट (Official Website)

http://isro.gov.in/

जाहिरात पाहा (View Ad)

https://www.isro.gov.in/media_isro/pdf/recruitmentNotice/NRSC_RMT_1_2023.pdf

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या