Weather Update | राज्यात पावसाला पोषक हवामान, ‘या’ ठिकाणी बरसणार अवकाळी पाऊस

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सध्या सातत्याने बदल होताना दिसत आहे. राज्यामध्ये पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. त्यामुळे आज (31 मार्च) विदर्भामध्ये मेघगर्जनेसह अवकाळी पावसाची (Unseasonal rain) शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर, उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात विजांसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. तर, उर्वरित राज्यामध्ये उन्हाचा चटका वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

‘या’ ठिकाणी बरसणार अवकाळी पाऊस (Unseasonal rain will fall at ‘this’ place)

राज्यामध्ये उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकण आणि विदर्भातील बहुतांश भागांमध्ये विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात (Weather Update) आली आहे. तर उर्वरित राज्यामध्ये उन्हाचा चटका कायम राहणार असल्याचा इशारा देखील हवामान खात्याने दिला आहे. राज्यामध्ये पावसाला पोषक हवामान तयार झालेले असून विदर्भामध्ये 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. आज विदर्भामध्ये अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा या ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

‘या’ ठिकाणी राहणार ढगाळ वातावरण (Cloudy atmosphere will stay in ‘this’ place)

राज्यामध्ये विदर्भासह मुंबई, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, रत्नागिरी या ठिकाणी देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात (Weather Update) आली आहे. आज (31 मार्च) नाशिक, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन देखील हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

शेतीतील पिकांना अवकाळी पावसाचा फटका (Unseasonal rains hit agricultural crops)

राज्यामध्ये मार्च महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने हजेरी (Weather Update) लावली. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेल्या रब्बी पिकांची नासाडी झाली आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसासह गारपिटीने हजेरी लावली होती. त्यामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

महत्वाच्या बातम्या