Imtiaj Jaleel | “युवकांनी माझ्यावर दगडफेक केली”; इम्तियाज जलील यांचा दावा

Imtiaj Jaleel | Chhatrapati Sambhajinagar छत्रपती संभाजीनगर : काल रात्री छत्रपती संभाजीनगरशहरात दोन गटात राडा झाला. युवकांनी पोलिसांच्या एकूण २० गाड्या जाळल्या. पोलिसांवर दगडफेक केली. यावर कालच्या राड्यात इम्तियाज जलील (Imtiaj Jaleel) यांनी देखील जाऊन पाहणी केली. हा वाद थांबवण्यासाठी त्यांनी स्वतः प्रयत्न केल्याचं माध्यमांशी बोलताना सांगितलं. त्यांच्यावर देखील कालचं प्रकरण बेतलं असल्याचं जलील म्हणाले.

“माझ्यावर दगडफेक करण्यात आली” ( Attack on Imtiaj Jaleel )

माध्यमांशी बोलताना जलील म्हणाले,”काल झालेल्या रात्रीच्या राड्यात मला काही लोकांचे फोन आले. मी येण्याचा प्रयत्न केला त्यावर पोलिसांनी येऊ नये असे सांगितलं. परिस्थिती भयानक झाल्यानंतर मी दुचाकी वाहनाने घटनास्थळी पोहोचलो. तेव्हा माझ्यावरही दगडफेक झाली. त्यावेळी जे घडत होतं, ते कल्पेनेबाहेरील होतं. अशा स्थितीत राममंदिरात शांतता राहावी असे माझे प्रयत्न होते.”

दंगलखोरांनी केलं ड्रग्सचं सेवन (The Rioters Consume Drugs)

“जेव्हा माझ्यावर दगडफेक केली. तेव्हा मला जाणवलं की, या मुलांनी ड्रग्सचं सेवन केलं. ते कोणाच्याही नियंत्रणात येत नव्हते. माझ्यावर दगड फेकू लागल्यानंतर पोलिसांनी मला बाहेर येऊ नका असं सांगितलं. दोन – तीन तास हेच सुरू होतं. पोलिसांना घटनास्थळी यायला दोन तास लागल्याने दंगल वाढली. असं किती मोठ शहर होतं माझं, की तिथं पोलिसांना पोहचायला दोन तास लागले”, असे वक्तव्य जलील यांनी केलं.

महत्वाच्या बातम्या