Tulsi Facepack | चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी वापरा तुळशीचे ‘हे’ फेसपॅक

Tulsi Facepack | टीम महाराष्ट्र देशा: भारतामध्ये तुळशीला अत्यंत पवित्र मानले जाते. तुळस फक्त पूजेसाठीच नाही, तर अनेक रोगांवर उपचार म्हणून वापरली जाते. तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात, जे आरोग्यासोबतच त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकतात. तुळशीमध्ये विटामिन ए, विटामिन सी, बीटा कॅरोटीन, आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळून येतात, जे त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकतात. तुळशीच्या मदतीने त्वचेवरील डाग, मुरूम इत्यादी समस्या दूर होऊ शकतात. त्वचेची काळजी (Skin Care) घेण्यासाठी तुम्ही तुळशीचे खालील फेसपॅक वापरू शकतात.

कोरफड आणि तुळस (Aloe vera-Tulsi Facepack)

त्वचेची काळजी घेण्यासाठी तुळस आणि कोरफडीचा फेसपॅक उपयुक्त ठरू शकतो. यासाठी तुम्हाला मूठभर तुळशीची पाने घेऊन मिक्सर मधून बारीक करून घ्यावी लागेल. त्यानंतर या मिश्रणामध्ये तुम्हाला एक चमचा कोरफडीचा गर मिसळून घ्यावा लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण वीस मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागते. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. आठवड्यातून तीन वेळा या फेसपॅकचा वापर केल्याने चेहऱ्यावरील पिंपल्स आणि डाग दूर होऊ शकतात.

मध आणि तुळस (Honey-Tulsi Facepack)

त्वचेवरील डागांची समस्या दूर करण्यासाठी तुळस आणि मधाचा फेसपॅक उपयुक्त ठरू शकतो. मध आपल्या त्वचेला खोलवर स्वच्छ करण्यास मदत करतो. तुळस आणि मधाचा फेसपॅक बनवण्यासाठी तुम्हाला एक चमचा तुळशीच्या पेस्टमध्ये एक चमचा मध मिसळून घ्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला हे मिश्रण साधारण पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. पंधरा मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाच्या मदतीने त्वचा मऊ आणि चमकदार होऊ शकते.

मुलतानी माती आणि तुळस (Multani Mati-Tulsi Facepack)

तुळस आणि मुलतानी मातीचा फेसपॅक बनवण्यासाठी तुम्हाला दोन चमचे मुलतानी मातीमध्ये एक चमचा तुळशीची पेस्ट आणि एक चमचा गुलाब जल मिसळून घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला हे मिश्रण साधारण पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. पंधरा मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. आठवड्यातून तीन वेळा या फेसपॅकचा वापर केल्याने चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल निघून जाण्यास मदत होते.

चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही वरील पद्धतीने तुळशीचा वापर करू शकतात. त्याचबरोबर नाकावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी तुम्ही खालील घरगुती उपाय करू शकतात.

बेकिंग सोडा (Baking soda-For Blackheads)

नाकावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी बेकिंग सोडा उपयुक्त ठरू शकतो. यासाठी तुम्हाला दोन चमचे पाण्यामध्ये एक चमचा बेकिंग सोडा मिसळून घट्ट पेस्ट तयार करून घ्यावी लागेल. ही पेस्ट तुम्हाला नाकावर साधारण दहा मिनिटे लावून ठेवावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा कोमट पाण्याने धुवावा लागेल. बेकिंग सोडा त्वचेवरील अतिरिक्त तेल आणि ब्लॅकहेड्स काढून टाकण्यास मदत करतो.

टोमॅटो (Tomato-For Blackheads)

नाकावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी टोमॅटोचा वापर केला जाऊ शकतो. यासाठी तुम्हाला ब्लॅकहेड्सवर साधारण पंधरा मिनिटे टोमॅटो लावून ठेवावे लागेल. पंधरा मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा कोमट पाण्याने धुवावा लागेल. आठवड्यातून दोन वेळा ब्लॅकहेड्सवर टोमॅटो लावल्याने ते सहज दूर होऊ शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.