Suger Control | उन्हाळ्यामध्ये शुगर लेवल कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

Suger Control | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे खूप कठीण होऊन जाते. या ऋतूमध्ये गरम वातावरणामुळे भरपूर घाम येतो, त्यामुळे डायबिटीसच्या रुग्णांना उष्माघात होण्याची शक्यता अधिक असते. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये डायबिटीसच्या रुग्णांना डिहायड्रेशनच्या समस्याला सामोरे जावे लागते. शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात न राहिल्यामुळे रक्तवाहिन्या आणि नसांना नुकसान होऊ शकते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे खूप महत्त्वाची आहे. उन्हाळ्यामध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही खालील टिप्स फॉलो करू शकतात.

नेहमी हायड्रेट राहा (Always stay hydrated-Suger Control)

उन्हाळ्यामध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी भरपूर पाण्याचे सेवन केले पाहिजे. पाण्याचे भरपूर प्रमाणात सेवन केल्याने शरीरातील अतिरिक्त साखर बाहेर पडण्यास मदत होते. त्याचबरोबर पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्याने डीहायड्रेशनची समस्या दूर होऊ शकते.

हाय-फायबरचा आहारात समावेश करा (Include high-fiber in the diet-Suger Control)

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करू शकतात. फायबरयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची वाढ थांबते. यासाठी तुम्ही ओट्स, ब्राऊन राईस, धान्य, ब्रेड, फळे इत्यादी पदार्थांचा सेवन करू शकतात.

ज्यूस, कोल्ड्रिंक्स इत्यादींचे सेवन टाळा (Avoid consumption of juices, cold drinks etc-Suger Control)

उन्हाळ्यामध्ये शरीराला थंड आणि फ्रेश ठेवण्यासाठी बहुतांश लोक ज्यूस, कोल्ड्रिंक्स इत्यादी पेयांचे सेवन करतात. या पेयांमध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असल्यामुळे ग्युकोजची पातळी लवकर वाढू शकते. त्यामुळे तुम्ही जर मधुमेहाचे रुग्ण असाल तर तुम्ही उन्हाळ्यामध्ये ज्यूस आणि कोल्ड्रिंक्स सेवन करणे टाळले पाहिजे.

उन्हाळ्यामध्ये शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी तुम्ही खालील टिप्स फॉलो करू शकतात. त्याचबरोबर या गरम हवामानामध्ये सुस्ती, आळस आणि थकवा टाळण्यासाठी तुम्ही आहारात खालील पदार्थांचा समावेश करू शकतात.

प्रोटीनयुक्त पदार्थांचे सेवन करा (Consume protein rich foods-Fatigue Prevention)

आहारामध्ये प्रोटीनचा समावेश केल्याने थकवा दूर होण्यास मदत होते. माफक प्रमाणात प्रोटीनचे सेवन केल्याने शरीराला ओमीनो ऍसिड मिळते. यासाठी तुम्ही सकाळी नाष्ट्यामध्ये अंडी खाऊ शकतात. अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळून येते, त्यामुळे सकाळी अंड्याचे सेवन केल्याने तुम्ही दिवसभर ऊर्जावर राहू शकतात.

आहारात विटामिन सीचा समावेश करा (Include vitamin C in your diet-Fatigue Prevention)

उन्हाळ्यामध्ये आळस आणि सुस्तीपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात विटामिन सीचा समावेश करू शकतात. यासाठी तुम्ही लिंबू, मोसंबी इत्यादी लिंबूवर्णीय फळांचे सेवन करू शकतात. या फळांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येते, त्यामुळे या फळांचे सेवन केल्याने पचनक्रियाही मजबूत होते. उन्हाळ्यामध्ये विटामिन सीयुक्त पदार्थ खाल्ल्याने तुम्ही आळस आणि सुस्तीपासून दूर राहू शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.