Mango Juice | उन्हाळ्यामध्ये आंब्याचा रस प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Mango Juice | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये बाजारात आंबे सहज उपलब्ध असतात. आंबा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. त्याचबरोबर आंब्याचा रस देखील आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. कारण यामध्ये विटामिन सी, बीटा-केरोटीन, आयरन, पोटॅशियम इत्यादी पोषक घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात, जे आरोग्याची काळजी (Health Care) घेण्यास मदत करतात. त्यामुळे आंब्याच्या रसाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. उन्हाळ्यामध्ये आंब्याच्या रसाचे सेवन केल्याने आरोग्याला खालील फायदे मिळू शकतात.

बीपी नियंत्रणात राहतो (BP remains under control-Mango Juice Benefits)

आंब्याच्या रसामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम आढळून येते, जे बीपी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. आंब्याचा रस प्यायल्याने हृदय आणि रक्तवाहिन्यांवर दबाव पडत नाही, परिणामी हृदयविकाराचा झटका आणि इतर आजार होण्याची शक्यता कमी होते.

डोळ्यांसाठी फायदेशीर (Good for eyes-Mango Juice Benefits)

आंब्याच्या रसामध्ये भरपूर प्रमाणात कॅरोटीनोइड्स आणि विटामिन ए आढळून येतात, जे तुमच्या दृष्टीसाठी चांगले ठरू शकते. यामध्ये आढळणारे विटामिन ए अँटीऑक्सीडेंट म्हणून काम करते आणि रेटिनाचा ऑक्सिडेटिव्ह कमी करण्यास मदत करते. आंब्याच्या रसाचे सेवन केल्याने मोतीबिंदू होण्याची शक्यता कमी होते.

रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते (Immunity is strengthened-Mango Juice Benefits)

आंब्याच्या रसामध्ये माफक प्रमाणात विटामिन सी आढळून येते. त्यामुळे आंब्याच्या रसाचे नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. उन्हाळ्यामध्ये आंब्याच्या रसाचे सेवन केल्याने तुम्ही सर्दी-खोकला इत्यादी मोसमी आजारांपासून दूर राहू शकतात.

उन्हाळ्यामध्ये आंब्याचा रस प्यायल्याने आरोग्याला वरील फायदे मिळू शकतात. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये शुगर लेवल कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी तुम्ही खाली टिप्स फॉलो करू शकतात.

नेहमी हायड्रेट राहा (Always stay hydrated-Suger Control)

उन्हाळ्यामध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी भरपूर पाण्याचे सेवन केले पाहिजे. पाण्याचे भरपूर प्रमाणात सेवन केल्याने शरीरातील अतिरिक्त साखर बाहेर पडण्यास मदत होते. त्याचबरोबर पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्याने डीहायड्रेशनची समस्या दूर होऊ शकते.

हाय-फायबरचा आहारात समावेश करा (Include high-fiber in the diet-Suger Control)

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करू शकतात. फायबरयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची वाढ थांबते. यासाठी तुम्ही ओट्स, ब्राऊन राईस, धान्य, ब्रेड, फळे इत्यादी पदार्थांचा सेवन करू शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.