Blackheads | चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी बेकिंग सोड्याचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Blackheads | टीम महाराष्ट्र देशा: आपल्या चेहऱ्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यामध्ये ब्लॅकहेड्स समस्या सर्वात सामान्य आहे. चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय शोधत असतात. यासाठी बहुतांश लोक केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर करतात. परंतु, केमिकलयुक्त उत्पादन वापरल्याने त्वचेला हानी पोहोचण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात उपलब्ध असलेल्या बेकिंग सोड्याचा (Baking soda) वापर करू शकतात. बेकिंग सोड्यामध्ये आढळणारे गुणधर्म चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स सहज दूर करू शकतात. चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी तुम्ही खालील पद्धतीने बेकिंग सोड्याचा वापर करू शकतात.

बेकिंग सोडा आणि मध (Baking soda and honey-For Blackheads)

चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी बेकिंग सोडा आणि मध उपयुक्त ठरू शकतो. या दोन्हीमध्ये आढळणारे गुणधर्म त्वचेला खोलवर स्वच्छ करू शकतात. यासाठी तुम्हाला एक चमचा मधामध्ये एक चमचा बेकिंग सोडा मिसळून घ्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला ही पेस्ट ब्लॅकहेड्सवर लावावी लागेल. साधारण पंधरा मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा लागेल. आठवड्यातून तीन वेळा या मिश्रणाचा वापर केल्याने चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स दूर होऊ शकतात.

बेकिंग सोडा आणि लिंबू (Baking soda and lemon-For Blackheads)

बेकिंग सोडा आणि लिंबाचा वापर करून देखील चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स दूर करता येऊ शकतात. यासाठी तुम्हाला एक चमचा बेकिंग सोड्यामध्ये काही थेंब लिंबाचा रस मिसळून पेस्ट तयार करून घ्यावी लागेल. ही पेस्ट तुम्हाला साधारण 15 मिनिट ब्लॅकहेड्सवर लावून ठेवावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. आठवड्यातून तीन वेळा या मिश्रणाचा वापर केल्याने चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स दूर होऊ शकतात.

बेकिंग सोडा पेस्ट (Baking soda paste-For Blackheads)

ब्लॅकहेड्सच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही फक्त बेकिंग सोडायचा वापर करू शकतात. बेकिंग सोड्याच्या मदतीने चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स सहज दूर होऊ शकतात. यासाठी तुम्हाला एक चमचा बेकिंग सोड्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी मिसळून पेस्ट तयार करून घ्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला ही पेस्ट साधारण पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावी लागेल. पंधरा मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल.

चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी तुम्ही वरील उपायांचा अवलंब करू शकतात. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही खालील टिप्स फॉलो करू शकतात.

कोरफड (Aloevera-Summer Face Care)

उन्हाळ्यामध्ये चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी कोरफड उपयुक्त ठरू शकते. कोरफड थंड असते. त्याचबरोबर कोरफड त्वचेचे उन्हापासून संरक्षण करतात. उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्हाला कोरफडीचा गर साधारण वीस मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल उन्हाळ्यामध्ये दररोज कोरफडीचा गर चेहऱ्यावर लावल्याने त्वचा निरोगी राहू शकते.

चंदन पावडर (Sandalwood powder-Summer Face Care)

चंदन पावडर थंड असते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही चंदन पावडरचा वापर करू शकतात. चंदर पावडरच्या मदतीने पिंपल्स दूर होण्यास मदत होते. त्याचबरोबर चंदन पावडर चेहऱ्याला कुलिंग इफेक्ट प्रदान करते. नियमित चंदन पावडरच्या वापरामुळे त्वचेचा रंग सुधारतो आणि त्वचेवरील चमक देखील वाढते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.