Uddhav Thackeray | ‘जय भवानी जय शिवाजी’ म्हणतं मतदान करा, उद्धव ठाकरेंचं जनतेला आवाहन

Uddhav Thackeray | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

‘जय बजरंग बली’ म्हणा आणि मतदान करा असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर सभेत सांगितले होते. असेच धार्मिक आवाहन बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते म्हणून त्यांचा मतदानाचा हक्क काढून घेण्यात आला होता. मात्र, कदाचित आता नियम बदलले आहेत. असं म्हणत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

कर्नाटकातील मराठी जनतेने मतदान करताना ‘जय भवानी जय शिवाजी’ म्हणा आणि मग मतदान करा, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी यावेळी केले. मराठी बांधवांचे हित जपण्यासाठी आणि मराठी एकीकरणासाठी मराठी उमेदवारांना मत द्या, असे देखील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यावेळी म्हणाले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, “महाविकास आघाडीला तडा जाईल असे मी काहीही बोलणार नाही, मला व्यक्तीचा नाही तर वृत्तीचा पराभव करायचा आहे. त्याचबरोबर हुकूमशाहीला हरवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. त्यामुळे मी माझ्या मतांवर ठाम आहे.

‘लोक माझे सांगाती’ या शरद पवारांच्या आत्मचरित्रामध्ये शिवसेनेवर आणि उद्धव ठाकरेंवर दोनदा टीका करण्यात आली आहे. “पवारांना मी सल्ला कसा देऊ? मी त्यांना सल्ला देणारा कोण? त्यांना माझा निर्णय पचला नाही तर मी काय करू?” असे प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केले आहे.

महत्वाच्या बातम्या