Uddhav Thackeray | “माझा सल्ला पवारांना पचला नाही तर…” ; उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

Uddhav Thackeray | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, “प्रत्येक पक्षाला त्यांच्या अंतर्गत बदल करण्याचा अधिकार आहे. महाविकास आघाडीला तडा जाईल असं राष्ट्रवादी काही करणार नाही असं मला वाटतं. शरद पवारांच्या अंतिम निर्णयानंतर मी बोलणार आहे.” पवारांना माझा निर्णय पचला नाही तर मी काय करू? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

पुढे बोलताना ते (Uddhav Thackeray) म्हणाले, “महाविकास आघाडीला तडा जाईल असे मी काहीही बोलणार नाही, मला व्यक्तीचा नाही तर वृत्तीचा पराभव करायचा आहे. त्याचबरोबर हुकूमशाहीला हरवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. त्यामुळे मी माझ्या मतांवर ठाम आहे.

दरम्यान, माध्यमांशी बोलत असताना अब्दुल सत्तारांनी वज्रमुठ सभेबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “वज्रमुठ अत्यंत मोठी झाली आहे. त्याचे परिणाम दिसत असतील, त्यामुळे मला फार बोलायची गरज आहे का? वज्रमुठ सभा कशामुळे रद्द झाल्या आहेत? उन्हामुळे रद्द झाले आहे, की पक्षात ऊन जास्त झालं म्हणून रद्द झाल्या आहेत.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.