Sharad Pawar Resigns | 11 मे नंतर स्थापन होणार नवीन सरकार; ‘त्या’ ट्विटनंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Sharad Pawar Resigns | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता कोण चालवणार? असा प्रश्न उपस्थित झाला असताना नव्या सरकार स्थापनेच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं आहे. ॲड. असीम सरोदे (Adv. Asim Sarode) यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्याचबरोबर अजित पवारांचे राज्यामध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून अनेक ठिकाणी पोस्टर झळकले. अशात शरद पवारांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. या सर्व गोष्टी सुरू असताना ॲड. असीम सरोदे यांनी ट्विट करत मोठ्या दावा केला आहे. त्यांच्या या ट्विटमुळे नवीन सरकार स्थापनेच्या चर्चांना पुन्हा उधान आलं आहे.

ट्विटरवर पोस्ट करत असीम सरोदे यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष निवडीची तारीख जाहीर केली आहे. त्याचबरोबर त्यांनी नवीन सरकार स्थापन होणार, असा दावा केला आहे. त्यांच्या या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

ॲड. असीम सरोदे यांचे ट्विट, “राष्ट्रवादीचे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष,अध्यक्ष, कार्याध्यक्ष, पदाधिकारी 10 मे च्या आधी नक्की होतील.
11 मे नंतर नवीन सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग येणार हे सुद्धा नक्की.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.