IPL 2023 | दुखापतीमुळे गेल्या वर्षी टीम इंडियातून बाहेर राहणारा ‘हा’ खेळाडू आयपीएलमध्ये करणार पुनरागमन

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या वर्षी दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर राहणारा गोलंदाज दीपक चहर (Deepak Chahar) तंदुरुस्त झाला असून, त्याला यावर्षीच्या आयपीएलची ओढ लागली आहे. गेले दोन-तीन महिने मी दुखापतीतून सावरण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहे, असे चहर म्हणाला आहे. त्यामुळे मी आयपीएल (IPL 2023) मध्ये चांगली कामगिरी करू शकतो असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याबाबत बोलताना चहर म्हणाला, “दुखापतीतून सावरण्यासाठी गेले दोन-तीन महिने मी खूप मेहनत घेत आहे. माझ्या घोट्याला पहिल्यांदा दुखापत झाली होती. त्यानंतर मी मांडीच्या दुखापतीला झुंज दिली. या दुखापतीतून सावरण्यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागली आहे. यामुळे मला कित्येक महिने क्रिकेटपासून दूर राहावे लागले आहे.”

पुढे बोलताना चहर म्हणाला, “मी फक्त फलंदाज असतो तर दुखापतींशिवाय मी सलग कित्येक सामने खेळले असते. परंतु जलद गोलंदाजांना दुखापतींचा सामना करावा लागतो. आम्हाला नेहमी दुखापत होण्याचे भय असते. मला माझ्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये धोक्यात आणणाऱ्या दुखापती झाल्या आहेत. दुखापतीमुळे खेळांपासून लांब राहणे कुणालाच आवडत नाही, मात्र प्रत्येक खेळाडूला कधी ना कधी या परिस्थितीचा सामना करावा लागतो.”

आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी मी उत्सुक आहे-दीपक चहर (I am looking forward to doing well in IPL-Deepak Chahar)

“टीम इंडियातील अनेक जलद गोलंदाजांना दुखापतीचा सामना करावा लागत आहे. जेव्हा आम्ही पूर्णपणे तंदुरुस्त असतो तेव्हा आमच्याकडून चांगली गोलंदाजी होते. मनापासून क्रिकेट खेळणे हेच माझे ध्येय आहे आणि त्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत राहतो. आयपीएल (IPL 2023) मध्ये मी चांगली कामगिरी करण्यासाठी खूप उत्सुक आहे”, असा विश्वास देखील चहर यावेळी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.