Sushma Andhare | बीड: बीडमध्ये झालेला ठाकरे गटाचा वाद चांगलाच पेटला आहे. ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारेंना दोन चापट्या लगावल्या असल्याचा दावा केला आहे. मात्र, सुषमा अंधारेंनी हा दावा फेटाळला आहे. या सर्व प्रकरणानंतर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या, “सुषमा अंधारेवर हात उचलला असं म्हणल्यावर गोंधळ उडू शकतो, म्हणून आप्पासाहेब जाधव यांनी हा दावा केला असावा. एखादा माणूस स्वतः येऊन सांगतो की मी हात उचलला आहे. याचा अर्थ असा की त्याच्या मनात असं काही करण्याचा विचार नक्की असू शकतो.”
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “तो माणूस ज्या आवेशत बोलला त्यावरून निश्चितपणे शिंदे गटाकडून किंवा शिवसेनेकडून मी पुन्हा उभा राहू नये, असं त्यांना वाटत आहे. त्यांच्याकडून माझ्या जीवाला धोका आहे. मला मारहाण झाली असती तर आप्पासाहेब जाधव परत गेले असते का? त्याचबरोबर हे प्रकरण आत्तापर्यंत थांबला असतं का? हा दावा करून त्यांना फक्त गोंधळ निर्माण करायचा आहे. या गोंधळातून ते आमच्या सभेवरून लक्ष विचलित करत आहे.”
दरम्यान, सुषमा अंधारे यांना मारहाण केल्याचा दावा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी केला. मात्र, सुषमा अंधारे यांनी हा दावा फेटाळला आहे. सुषमा अंधारे यांनी फेसबुक लाईव्ह घेत घडलेल्या घटनेचा घटनाक्रम सांगितला आहे. त्याचबरोबर आप्पासाहेब जाधव यांनी केलेला दावा खोटं असल्याचं अंधारे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Tuljabhavani Mandir | तुळजा भवानी मंदिर प्रशासनाचा ‘ड्रेस कोड’वरुन अवघ्या काही तासांत यू टर्न!
- Nitesh Rane | “एक रुपयाचीही कमाई नसताना उद्धव ठाकरे…”; नितेश राणेंचा ठाकरेंवर घणाघात
- Samana Editorial | “स्वतःला हिंदुत्ववादी वगैरे म्हणून घेणाऱ्या…”; सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाजपवर टीकास्त्र
- Sanjay Raut | “कुणाचा पोपट उडतोय…”; संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर
- Jitendra Awhad | शरद पवारांना ड्राम्याची गरज नाही; जितेंद्र आव्हाडांचं फडणवीसांना प्रत्युत्तर