Nitesh Rane | “एक रुपयाचीही कमाई नसताना उद्धव ठाकरे…”; नितेश राणेंचा ठाकरेंवर घणाघात

Nitesh Rane | सिंधुदुर्ग: बीडमध्ये झालेला ठाकरे गटाचा वाद चांगलाच तापला आहे. ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांना दोन चापट्या लगावल्या असल्याचा व्हिडिओ आप्पासाहेब जाधव यांनी स्वतः शेअर केला. या पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे यांनी गंभीर आरोप केले आहे. त्याचबरोबर या प्रकरणावर बोलताना नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) … Read more

Published On: 

Nitesh Rane | सिंधुदुर्ग: बीडमध्ये झालेला ठाकरे गटाचा वाद चांगलाच तापला आहे. ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांना दोन चापट्या लगावल्या असल्याचा व्हिडिओ आप्पासाहेब जाधव यांनी स्वतः शेअर केला. या पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे यांनी गंभीर आरोप केले आहे. त्याचबरोबर या प्रकरणावर बोलताना नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) घणाघात केला आहे.

उद्धव ठाकरेंवर टीका करत नितेश राणे म्हणाले, “जसा पक्षप्रमुख आहे तसेच कार्यकर्ते. उद्धव ठाकरेंनी आयुष्यामध्ये हेच केलं आहे. एक रुपयाचीही कमाई नसताना ते आलिशान आयुष्य कसं काय जगतात? मातोश्रीमध्ये एसी कोणत्या कंपनीचे आहेत. व्हिडिओकॉन कंपनीचे एसी मातोश्रीमध्ये लावलेले आहेत. व्हिडिओकॉन कंपनीचे मालक कोणाचे खासदार होते? त्याचबरोबर परदेशी दौऱ्यात उद्धवजींच्या खिशातून एक रुपयाही जात नाही. सुषमाजी अजून काय वेगळं करणार, त्याचबरोबर संजय राऊत अजून काय वेगळं करणार? महाराष्ट्राला दरोडेखोर म्हणून लुटतात आणि मग दुसऱ्यांवर आरोप करतात?”

बीडमध्ये झालेल्या प्रकरणावर प्रतिक्रिया देत नितेश राणे म्हणाले, “सुषमाताई आमच्या कितीही देवी देवतांवर बोलल्या आमच्यावर किती आरोप केले, तरी त्यांच्यावर झालेल्या मारहाणीचा आम्ही समर्थन करत नाही. मात्र, त्यांच्यावर झालेले आरोप आमच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. ऑफिससाठी सोपा आणि एसीसाठी त्या पैसे मागत होत्या.”

दरम्यान, सुषमा अंधारे यांना मारहाण झाल्याचा दावा जिल्हा प्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी केला आहे. सध्या सुषमा अंधारे बीड दौऱ्यावर आहेत. जाधव यांनी अंधारेंवर मारहाण झाल्याचा आरोप केला. मात्र, मला मारहाण झालेली नाही, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहे.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही