Supriya Sule | पुणे : पुण्यातील पोटनिवडणुकीमध्ये कसबा मतदारसंघात भाजप पक्षाला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांचा पराभव झाला आहे. महाविकास आघाडीमधील काँग्रेसचे उमेदवर रवींद्र धंगेकर (Ravindra dhangekar) यांनी विजय मिळवून कसब्यात इतिहास रचला आहे.
भाजपचा बालेकिल्ला धंगेकरांनी भेदला
तब्बल 28 वर्षांनी भाजपच्या बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत धंगेकरांचा ऐतिहासिक विजय असल्याचं मानलं जातं आहे. या पराभवानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. यावर आता राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी निकालावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Supriya Sule reaction On Kasba Election Result
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत यशस्वी झालेले महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर हे मूळचे आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील आहेत. ही आणखी एक आनंद द्विगुणित करणारी बाब आहे. धंगेकर कुटुंब हे मूळचे नाथाची वाडी, ता. दौंड येथील असल्याचे आहेत”, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी धंगेकर यांचं अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत यशस्वी झालेले महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर हे मूळचे आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील आहेत ही आणखी एक आनंद द्विगुणित करणारी बाब आहे. धंगेकर कुटुंब हे मूळचे नाथाची वाडी, ता. दौंड येथील आहे. https://t.co/h0nomBtkYM
— Supriya Sule (@supriya_sule) March 2, 2023
“पोटनिवडणुकीच्या विजयाच्या निमित्ताने भाजपला लोकांनी नाकारले असल्याचे सांगत मराठी माणूस पैशात विकला जात नाही”, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी धंगेकरांचं अभिनंदन केलं आहे. पैसे वाटल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या इतर नेत्यांवर झाला होता. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
“हा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तसेच आणि नेत्यांनी केलेल्या संघटीत प्रयत्नांचा विजय आहे. यासाठी दिवसरात्र एक करुन प्रचार केलेल्या सर्वांचे मनापासून आभार. मराठी माणूस पैशात विकला जात नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. राजकीय पक्षापेक्षा हा येथील विजय हा कार्यकर्त्यांचा विजय झाला आहे. त्यामुळे या विजयाचे खरे श्रेय हे कसब्यातील कार्यकर्त्यांना जाते, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी भाजपला टोला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या-
- Amol Mitkari | “तुझी लायकी जनतेला माहितीये, आम्हाला घाणीत दगड…”; निलेश राणेंच्या ‘त्या’ टीकेवरुन अमोल मिटकरी आक्रमक
- Uddhav Tahckeray | “वापरा आणि फेका हे भाजपचं धोरण”; उद्धव ठाकरेंचे भाजपवर ताशेरे
- Sanjay Raut | मोठी राजकीय घडामोड; संजय राऊतांना खुद्द शरद पवारांचं समर्थन
- Ajit Pawar | राम सातपुतेंनी शरद पवारांचा एकेरी उल्लेख केल्यानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया
- Sharad Pawar | भाजप आमदाराकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख; सभागृहात गदारोळ
‘कोण आफ्रिदी? कोणत्या जोकरचं नाव घेता…’, शाहिद आफ्रिदीचं नाव घेताच असदुद्दीन ओवैसी भडकले