Share

महाराष्ट्रातील पाकिस्तानी सिंधी समाजाला घाबरण्याचं, देश सोडण्याची गरज नाही – देवेंद्र फडणवीस

Pakistani nationals asked to leave India; Sindhi Hindus on long-term visas will not be affected, clarifies Devendra Fadnavis.

Published On: 

Sindhi Hindus Will Not Be Deported, Clarifies Devendra Fadnavis

पाकिस्तानी नागरिकांच्या देशाबाहेर पाठवण्याच्या केंद्र सरकारच्या आदेशानंतर महाराष्ट्रात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १०७ पाकिस्तानी नागरिक बेपत्ता असल्याचं म्हटलं होतं, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात कोणताही पाकिस्तानी बेपत्ता नसल्याचं सांगितलं होतं. या विरोधाभासावर आज फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलं.

फडणवीस म्हणाले की, “कधी कधी अधिकार्‍यांकडून नेत्यांना वेगवेगळी माहिती दिली जाते. केंद्र सरकारच्या आदेशानुसार आम्ही सर्व पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवली आहे. कोणतीही व्यक्ती दुर्लक्षित राहिलेली नाही. पोलिसांकडून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे. देश सोडण्यासाठी जे पात्र आहेत, त्यांना पाठवले जाईल आणि अंतिम आकडेवारी नंतर जाहीर केली जाईल.”

Sindhi Hindus Will Not Be Deported, Clarifies Devendra Fadnavis

सिंधी समाजाविषयी संभ्रम निर्माण झाल्यानंतर फडणवीसांनी स्पष्ट केलं की, “पाकिस्तानी सिंधी हिंदू नागरिकांना परत जाण्याची गरज नाही. ते लाँग टर्म व्हिसावर आले आहेत आणि भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज केले आहेत. त्यांच्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. केवळ मर्यादित कालावधीच्या व्हिसावर आलेल्या पाकिस्तानी नागरिकांवर कारवाई सुरू आहे.”

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सांगितलं की, “आम्ही सर्व पाकिस्तानी नागरिकांना केंद्र सरकारचा आदेश कळवून त्यांच्यावर लक्ष ठेवतो आहोत.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही