Share

“परेश रावलने १५ दिवस स्वतःची लघवी प्यायली? 😱 जाणून घ्या हा धक्कादायक किस्सा!

Paresh Rawal reveals he drank his own urine for 15 days on Veeru Devgan’s advice to heal a knee injury faster during ‘Ghatak’ shoot.

Published On: 

Paresh Rawal reveals he drank his own urine for 15 days on Veeru Devgan’s advice to heal a knee injury faster during ‘Ghatak’ shoot.”

🕒 1 min read

बॉलिवूडमधील अभिनेते परेश रावल ( Paresh Rawal ) यांनी अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या अभिनयप्रवासातील अनुभव सांगितले. त्यामध्ये सर्वाधिक धक्कादायक होता त्यांनी स्वतःच्या लघवीचे सेवन केल्याचा किस्सा.

परेश रावल यांनी सांगितले की, सनी देओलच्या ‘घातक’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. वेदना असह्य होत असताना अजय देवगण यांचे वडील वीरू देवगण यांनी त्यांना एक अनोखा सल्ला दिला होता. रोज सकाळी उठून स्वतःची लघवी प्यावी. वीरू देवगण यांच्या या सल्ल्यावर विश्वास ठेवत परेश रावल यांनी सलग १५ दिवस स्वतःची लघवी बिअरसारखी प्यायली होती.

Paresh Rawal urine therapy story

पुढे बोलताना परेश रावल म्हणाले, “लघवी जर प्यायचीच असेल तर योग्य प्रकारे प्यायला हवं, म्हणून मी घटाघट प्यायचो.” परिणामी, दीड महिन्याच्या आत त्यांच्या दुखापतीत लक्षणीय सुधारणा झाली, जेव्हा डॉक्टरांनी एक्स-रे पाहिला तेव्हा त्यांनाही धक्का बसला होता. सामान्यतः अशी दुखापत बरी होण्यास दोन ते अडीच महिने लागतात, मात्र कमी कालावधीतच बरे झाले असल्याचे रावल यांनी सांगितले.

दरम्यान, परेश रावल लवकरच प्रियदर्शनच्या ‘भूत बांगला’ या हॉरर कॉमेडी चित्रपटात अक्षय कुमार आणि तब्बूसोबत झळकणार आहेत. तसेच, बहुप्रतिक्षित ‘हेरा फेरी 3’मध्येही ते पुन्हा एकदा अक्षय आणि सुनील शेट्टीसोबत धमाल उडवताना दिसणार आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile