Share

पहलगाम हल्ल्यानंतर मुंबईत हायअलर्ट; CSMT स्थानकावर कडेकोट सुरक्षा बंदोबस्त

After the Pahalgam terror attack, Mumbai is on high alert. Security has been tightened at CSMT station with RPF, MSF, and Home Guards conducting patrols and mock drills to ensure passenger safety.

Published On: 

Pahalgam Attack: Mumbai on High Alert, Security Tightened at CSMT Station

🕒 1 min read

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाचा उद्रेक झाला आहे. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला असून, यात महाराष्ट्रातील सहा नागरिकांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत हायअलर्ट आदेश जारी करण्यात आला आहे.

मुंबईतील मुख्य रेल्वे स्थानकांवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकावर रेल्वे पोलीस दल (RPF), गृह रक्षक दल आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या (MSF) पथकांनी संयुक्तपणे गस्त वाढवली आहे.

CSMT हे दररोज लाखो प्रवाशांच्या वर्दळीचे ठिकाण असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने विशेष खबरदारी घेतली जात आहे. डॉग स्क्वॉड आणि बॉम्ब शोध पथकाच्या सहाय्याने स्थानक परिसराची सखोल तपासणी केली जात आहे. सीसीटीव्ही फुटेजचीही बारकाईने पाहणी सुरू आहे. संशयास्पद व्यक्ती वा वस्तू आढळल्यास तत्काळ कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत.

Pahalgam Attack: Mumbai on High Alert, Security Tightened at CSMT Station

दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर विविध निर्बंध लादल्याने दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून सुरक्षेची पातळी आणखी वाढवली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही