आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सवर ६ विकेट्स आणि ८ चेंडू राखून सहज विजय मिळवत मागच्या पराभवाचा जोरदार बदला घेतला. दिल्लीच्या घरच्या मैदानावर, कठीण खेळपट्टी आणि प्रभावी गोलंदाजीमुळे आरसीबीसमोर आव्हान होतं, मात्र विराट कोहली ( Virat Kohli ) आणि कृणाल पंड्याने ११९ धावांची भागीदारी करत संघाला मोठा विजय मिळवून दिला.
या विजयाच्या जल्लोषात विराट कोहलीने दिल्लीचा स्टार फलंदाज केएल राहुलच्या ‘हे माझं ग्राउंड आहे’ सेलिब्रेशनची मजेदार नक्कल केली. हा क्षण सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे.
Virat Kohli mimics KL Rahul celebration
या अगोदरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवरील सामन्यात केएल राहुलने नाबाद ९३ धावांची धडाकेबाज खेळी करत दिल्लीला विजय मिळवून दिला होता. त्यानंतर राहुलने ‘हे माझं ग्राउंड’ म्हणत बॅट उंचावत खास अंदाजात सेलिब्रेट केलं होतं. विराटने याचाच मजेशीर बदला घेतला. विजयानंतर विराटने राहुलसमोर कांतारा स्टाईलमध्ये बॅट आपटून सेलिब्रेट केलं. राहुलने पाहिलं नाही म्हणून विराटने पुन्हा तोच अभिनय केला, आणि शेवटी दोघंही हसत एकमेकांना मिठी मारताना दिसले.
या व्हिडिओवर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी विराटची मजेशीर अॅक्टिंग कौतुक केली आहे, तर काहींनी म्हटलं, “विराट कधीच विसरत नाही!”
महत्वाच्या बातम्या
- मुंबईच्या विजयात सूर्या-बुमराह चमकले; तरी हार्दिकने श्रेय नमन- कॉर्बिनकडे वळवलं!
- कृणाल पंड्याच्या शानदार खेळीने आरसीबीचा दिल्लीवर दणदणीत विजय, गुणतालिकेत अव्वल स्थान
- विराट कोहली आणि केएल राहुल सामन्यात भिडले; व्हिडीओ झाला व्हायरल
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








