Share

मुंबईच्या विजयात सूर्या-बुमराह चमकले; तरी हार्दिकने श्रेय नमन- कॉर्बिनकडे वळवलं!

Mumbai Indians continued their winning streak in IPL 2025 with a commanding 54-run victory over Lucknow Super Giants, led by strong performances from Suryakumar Yadav, Jasprit Bumrah, and crucial late contributions from Naman Dhir and Coetzee Bosch.

Published On: 

Weakness on Mumbai Indians in IPL 2025

🕒 1 min read

IPL 2025 मध्ये मुंबई इंडियन्सने आपल्या विजयी मालिका वानखेडे स्टेडियमवर चालू ठेवत, लखनौ सुपर जायंट्सचा सहज पराभव केला. कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने लखनौसमोर 216 धावांचं लक्ष्य ठेवत 54 धावांनी विजय मिळवला. या विजयासह मुंबईचा सलग पाचवा विजय नोंदला गेला असून प्लेऑफच्या शर्यतीत मुंबईने आपलं स्थान भक्कम केलं आहे.

मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी गमावून 215 धावा केल्या. रायन रिकेल्टनने 32 चेंडूत 58 धावांची दमदार खेळी केली, तर सूर्यकुमार यादवने 28 चेंडूत 54 धावांची आक्रमक खेळी साकारली. अखेरच्या षटकांत नमन धीर (25 नाबाद) आणि कॉर्बिन बॉश (10 धावा) यांनी मिळून 45 धावांची मोलाची भर घातली, ज्यामुळे मुंबईला 200 धावांचा टप्पा गाठता आला.

IPL 2025: Mumbai Indians Thrash Lucknow Super Giants by 54 Runs

प्रत्युत्तरात लखनौ सुपर जायंट्सचा डाव मुंबईच्या भेदक माऱ्यापुढे कोलमडला. जसप्रीत बुमराहने 4 बळी घेत निर्णायक घाव घातला. लखनौचा संघ 20 षटकांत 161 धावांवर ऑलआऊट झाला आणि मुंबईने हा सामना 54 धावांनी जिंकला.

विजयानंतर कर्णधार हार्दिक पंड्याने नमन धीर आणि कॉर्बिन बॉशच्या कामगिरीचे विशेष कौतुक करत सांगितले, “आम्हाला गेम कधी आणि कसा फिनिश करायचा ते माहीत आहे,” असे तो म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!