Share

‘सामना हरलो, पण युद्ध अजून बाकी…’ पराभवानंतर श्रेयस अय्यरचा निर्धार

After losing to RCB, Shreyas Iyer says, “We lost the match, but the war is not over.” Punjab scored just 101 runs in Qualifier-1.

Published On: 

After losing to RCB, Shreyas Iyer says, "We lost the match, but the war is not over." Punjab scored just 101 runs in Qualifier-1.

क्रीडा प्रतिनिधी – आयपीएल 2025 च्या क्वालिफायर-1 सामन्यात पंजाब किंग्सला मोठा धक्का बसला आहे. गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या पंजाबला थेट फायनलमध्ये जाण्याची सुवर्णसंधी होती, पण रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून 8 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. मात्र, या पराभवानंतर पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने ( Shreyas Iyer ) लढाऊ वृत्ती दाखवत केलेलं विधान चर्चेचा विषय बनला आहे, “सामना हरलो, पण युद्ध अजून बाकी आहे.”

सामना संपल्यानंतर अय्यर म्हणाला, “हा दिवस विसरायला हवा, पण अभ्यासायलाही हवा. सुरुवातीला आम्ही अनेक विकेट गमावल्या आणि त्यामुळेच खेळ बिघडला. माझ्या निर्णयांवर मला शंका नाही, तयारी योग्य होती, पण अंमलबजावणीत कमी पडलो. गोलंदाजांचाही दोष नाही, कारण धावसंख्या खूपच कमी होती.”

Shreyas Iyer Reacts After Punjab’s Defeat to RCB

अय्यरने पुढे स्पष्ट केलं की, “या खेळपट्टीवर फलंदाजी आव्हानात्मक ठरत आहे, असमान उसळीमुळे समस्या निर्माण झाली, पण ते पराभवाचं कारण नाही. आता फलंदाजीत सुधारणा करायला हवी. लढाई हरलो, पण युद्ध अजून संपलेलं नाही.”

या सामन्यात श्रेयस अय्यर स्वतः अपयशी ठरला. तो केवळ 3 चेंडूत बाद झाला. त्याला जोश हेझलवूडने चौथ्यांदा टी-20 मध्ये बाद केलं. एकाही फलंदाजाला 30 धावाही करता आल्या नाहीत. सर्वाधिक 26 धावा स्टोइनिसच्या आहेत. अखेर पंजाब किंग्स फक्त 101 धावांवर गारद झाला आणि आरसीबीने तब्बल 60 चेंडू राखून सहज विजय मिळवला.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही