Share

Shivsena | आयोगाच्या निकालानंतर शिवसेना भवनावर एकनाथ शिंदेंची सत्ता?? ; राऊत म्हणाले, “शिवसेनेची संपत्ती अन् लाखो शिवसैनिक…”

Shivsena | मुंबई : राज्यात शुक्रवारी मोठी राजकीय घडामोड घडली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्यानंतर ठाकरे गटाकडून शिंदे गट आणि भाजपावर जोरदार टीका करण्यात येत आहे. खासदार संजय राऊत यांनीही या निर्णयानंतर शिंदे गटाला लक्ष्य केलं आहे. संजय राऊत सध्या कोकणाच्या दौऱ्यावर असून राऊत आज कणकवलीत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेना भवन आणि शिवसेनेच्या शाखा शिंदे गटाच्या ताब्यात जाणार का? याबाबत बोलताना संजय राऊतांनी निवडणूक आयोगावर बोचरी टीका केली आहे.

“निवडणूक आयोगाने शेण खाल्लं म्हणून…”

“निवडणूक आयोगाने शेण खाल्लं म्हणून आमच्या शाखा त्यांच्या ताब्यात जाणार नाहीत. आमचे शिवसैनिक तिथेच बसतील आणि ती जागा शिवसेनेची शाखा म्हणूनच काम करेल. शिवसेना पक्ष आमचाच आहे. खुर्चीवर बसलेल्या काही लोकांनी निर्णय घेतला म्हणून पक्ष कुठेही जात नाही. शिवसेना भवनासह शिवसेनेची शाखा, शिवसेनेची संपत्ती आणि हजारो लाखो शिवसैनिक आमच्या बरोबरच राहतील”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

“आयोगाला हा जाब विचारण्याची वेळ आली”

“या देशातील सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येऊन आता निवडणूक आयोगाला हा जाब विचारण्याची वेळ आली आहे की, राजकीय पक्ष म्हणजे काय? राजकीय पक्षाची व्याख्या काय? एक पक्ष 50 वर्षांपासून उभा आहे. तो पक्ष घटनेनुसारच चालला आहे. त्या पक्षातील काही आमदार-खासदार आमिषाला बळी पडून बाहेर पडले. अशावेळी तो पक्ष त्यांचा कसा होऊ शकेल? हा प्रश्न सर्वांनी विचारण्याची वेळ लोकशाहीत आज आली आहे,” अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

Sanjay Raut criticize on Eknath Shinde group

“सकाळी वृत्तपत्रात जल्लोष करत असल्याचं पाहिलं. फोटोत मोजून सात चेहरे होते आणि त्यामध्ये एक अब्दुल्ला नाचत होता. बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. जे शिवसेना आधीच सोडून गेले आहेत ते काल शिंदे गटाबरोबर फटाके फोडत नाचत होते. असे अब्दुल्ला घेऊन शिवसेना वाढणार आहे का?”, असा सवालही यावेळी संजय राऊतांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

Shivsena | मुंबई : राज्यात शुक्रवारी मोठी राजकीय घडामोड घडली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now