Sharad Pawar । शरद पवारांना 2 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; धक्कादायक प्रकरण

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sharad Pawar । गुन्ह्यातून नाव कमी करण्यासाठी पैसे द्यावे लागतील नाहीतर कुटुंबीयांना या प्रकरणात अडकवण्याची धमकी देत शरद पवार यांनी अनिकेतच्या आई कडे 5 लाखांची मागणी केली होती.

अनिकेतच्या आईने तडजोड करून 2 लाख देण्याचे कबूल केले. त्यानंतर अनिकेतच्या कुटुंबीयांनी  याबद्दलची तक्रार ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.

त्यानंतर ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नारपोली पोलीस ठाण्यात मंगळवारी सकाळी केलेल्या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पवार ( Sharad Pawar ) यांना रंगेहाथ पकडले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

Sharad Pawar take a 2 lakhs bribe | Marathi News

मिळालेल्या माहितीनुसार योगेश रवी शर्मा ( वय १६ वर्षे ) याचे २५ नोव्हेंबरला अपहरण झाले होते. आरोपीने अल्पवयीन मुलाची हत्या करून मृतदेह गाडून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार ७ डिसेंबरला उघड झाला.

या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पवार यांनी हत्येच्या गुन्ह्यात आयुश विरेंद्र झा, मनोज नारायण टोपे, अनिकेत तुकाराम खरात, शिवाजी धनराज माने, संतोष सत्यनारायण ताटीपामुल या आरोपींना अटक केली होती.

महत्वाच्या बातम्या