Chhagan Bhujbal । छगन भुजबळांनी मंत्री पदाचा राजीनामा द्यावा; नंतर रडत बसावे

Chhagan Bhujbal should resign from the post of minister - Prakash Ambedkar

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Chhagan Bhujbal । मराठा आरक्षणासाठी मराठ्यांनी  ५८ मोर्चे शांततेत काढले होते. त्यानंतर मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात आंदोलनाला काही प्रमाणात यश येत, मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्यास सोपे झाले आहे.

परंतु सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मराठा समाजाची मागणी सरकारने पूर्ण केलेलीच नाही. सरकारने मराठा आरक्षणासाठी शासनाने अधिसूचनेच्या मसुद्यात पितृसत्ताक पद्धतीत सगेसोयऱ्यांना कुणबी ( Kunbi Caste Certificate ) दाखले देण्याची तरतूद केली केली आहे.

याला छगन भुजबळ यांनी आक्षेप घेतला आहे. मराठ्यांना वेगळे आरक्षण द्या, कशाला आमच्यात ( OBC) घुसवत आहात. अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal )  यांनी दिली आहे.

Chhagan Bhujbal should resign from the post of minister

जर मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडत असेल, तर कायदयाने त्यांना OBC प्रमाणपत्र देणे क्रमप्राप्त आहे. परंतु भुजबळ ( Chhagan Bhujbal )  मराठा- OBC वाद निर्माण करत समाजात फूट पाडत आहे. ज्या शिंदे-फडणवीस-पवार सरकारने  मराठ्यांना आरक्षण दिले, त्या सरकार मधून बाहेर पडून छगन भुजबळ निषेध का नोंदवत नाही, असा सवाल मराठा समाज विचारात आहे.

या सर्व प्रकारावर प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले,” एकाबाजूला सत्ता उपभोगायची आणि रडतही रहायचे अशा दोन्ही भूमिका घेणे योग्य नाही.  भुजबळांनी ( Chhagan Bhujbal ) राजीनामा दिला तर त्यांच्या म्हणण्याला वजन प्राप्त होईल;; असे आंबेडकर यांनी म्हटले आहे.

भुजबळ कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांनी अशा प्रकारे पब्लिकली भांडण्यापेक्षा थेट कॅबिनेटमध्ये आपले म्हणणे मांडावे, भुजबळांचे ऐकले जात नसेल तर त्यांनी राजीनामा देऊन मंत्रिमंडळातून थेट बाहेर पडावे असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या