Aishwarya । प्रसिद्ध अभिनेता अयोध्येत ऐश्वर्यासोबत बांधणार लग्नगाठ

राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या दिवशी अरुण राम गौडा आणि ऐश्वर्याचा साखरपुडा झाला

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Arun ram gowda And Aishwarya। कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अरुण राम गौडा (Arun Ram Gowda) आणि ऐश्वर्या यांनी 22 जानेवारी रोजी म्हणजेच राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटन सोहळ्याच्या दिवशी साखरपुडा केला.

अरुण आणि त्याची होणारी पत्नी ऐश्वर्या हे एकमेकांना गेल्या दहा वर्षांपासून डेट करत आहेत. आता लवकरच अरुण राम गौडा आणि ऐश्वर्या (Aishwarya) लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.

E-TIMES ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अरुण राम गौडानं सांगितलं, “प्रभू रामाचा भक्त असल्याने मला राम मंदिर उद्घाटनाच्या दिवशी साखरपुडा करायचा होता. माझा साखरपुडा हा अतिशय साध्या पद्धतीनं पार पडला.”

Aishwarya marry to arun ram gowda in Ayodhya Ram Mandir

पुढे अरुणनं सांगितलं, “मी आणि ऐश्वर्या (Aishwarya) दहा वर्षापेक्षा अधिक काळ रिलेशनशिपमध्ये आहोत, आम्ही पहिल्यांदा भेटलो जेव्हा आम्ही दोघे गेल्यारा बालगा थिएटर ग्रुपमध्ये सामील झालो होतो, त्यावेळी आम्ही खूप लहान होतो, आम्ही एकमेकांना पसंत करत होतो, आम्ही आमच्या संबंधित करिअरवर लक्ष केंद्रित केले होते.

आता आम्हाला वाटले की आमच्या नात्याला पुढील टप्प्यावर घेऊन जाण्याची योग्य वेळ आहे. एवढी वर्षे वाट पाहिल्यानंतर अखेर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतल्याने आमच्या दोन्ही कुटुंबातील सदस्यांना खूप आनंद झाला आहे.”

“ऐश्वर्या (Aishwarya) ही खूप निष्ठावान, समजूतदार आहे, माझाही रेस्टॉरंटचा व्यवसाय आहे, मी समतोल राखण्यात किती व्यस्त आहे हे तिला माहीत आहे. या वर्षाच्या अखेरीस अयोध्येच्या भूमीत लग्न करण्याचे प्लॅनिंग आम्ही करत आहोत.” असंही अरुण म्हणाला.

महत्वाच्या बातम्या