Chhagan Bhujbal । मराठ्यांना वेगळे आरक्षण द्या, कशाला आमच्यात ( OBC) घुसवत आहात? – छगन भुजबळ

Chhagan Bhujbal comment on obc Reservation & maratha Reservation

Chhagan Bhujbal मुंबई । मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी मराठा समाजाने केली होती. त्यावर सरकारने अधिसुचना काढत, हरकती मागवल्या आहेत.

त्यावर ओबीसी (OBC) नेत्यांची काल मुंबईत बैठक झाली. त्या बैठकीत तीन ठराव मंजूर करण्यात आले होते. त्यावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले की, काल रात्री ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. काल जे नेते उपस्थित होते ते नेते आज उपस्थित राहणार आहेत. दिवसभर कोणाची काय चर्चा आहेत. हरकती नोंदवायच्या आहेत. या संदर्भात चर्चा होणार आहे. जाहीर सभा होणार आहे. त्याचे देखील काम सुरू आहे. ओबीसी यात्रा काढायची आहे. त्या संदर्भात देखील कमिटी नेमलेली आहे. मार्ग आणि दिवस कोणता असेल याबाबत देखील काम करण्याची तयारी सुरू आहे.

बबनराव तायवाडे (Babanrao Taywade ) यांचे तुम्हाला समर्थन नाही आहे या प्रश्नावर भुजबळ म्हणाले,” नसेल तर नसेल. आमच्यात 374 वाटेकरी होते. त्यांना आम्ही सामावून घेतलं होतं. आता हजार वाटेकरी आहेत. ओबीसींच्या 54 टक्क्यांमध्ये आणखी 20 ते 25 टक्के लोक घुसवले. 374 जातींचे आरक्षण संपल्यात जमा झाले असे आम्हाला वाटते म्हणून आम्ही बोलतो.

सरकारमध्ये तुम्ही एकटे पडलात का? | Chhagan Bhujbal

यावर भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले की, मी कसला एकाकी पडलो, माझ्यासोबत करोडो ओबीसी बांधव सोबत आहेत. ओबीसीमध्ये जाणीवपूर्वक करोडो लोक बॅकडोअरने घुसवतात हे जाणीवपूर्वक आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. येथे मंत्र्याचा, मंत्रिमंडळाचा, सरकारचा कसला संबंध नाही. इथे माझ्या ओबीसी समाजाचे आरक्षण समाप्त होते आहे. त्याची आग आमच्या मनात भडकते आहे..

“कोणतीही अभिलाषा नाही, त्यांना सांगा मला काढून टाका”

सरकारमध्ये राहून लढणार की बाहेर पडून लढणार अशी विचारणा केली असता भुजबळ म्हणाले की, हे सरकारने आणि माझ्या पक्षाने ठरवावे. मुख्यमंत्र्यांनी ठरवावे, मला त्याची चिंता नाही. मला कुठल्याही पदाची अभिलाषा नाही. सरळ जाऊन सांगा तुम्ही याला काढा, असेही छगन भुजबळ म्हणाले.

पुढे बोलतांना भूजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले कि, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) भेटतील तेव्हा मी सांगणार की आग कशी कमी करणार आहात. मी त्यांना सांगणार आहे की, द्या ना त्यांना वेगळे आरक्षण, कशाला आमच्यात घुसवत आहात. ओबीसी समाजातून मराठा आरक्षण द्यायला सुरुवात झाली मग थांबवा ना ते, असे भुजबळ म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.