Maratha Reservation । मराठा आरक्षणासाठी मुंबईला जाणाऱ्या मनोज जरांगेंनी वाशीतूनच पळ काढला

Maratha reservation Manoj Jarange escaped from Vashi

Maratha Reservation ।मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे आणि त्यांच्या सोयऱ्यांनाही हे कुणबी प्रमाणपत्र ग्राह्य धरावे या प्रमुख मागण्या घेऊन मनोज जरांगे मुंबईला निघाले होते.

मराठा आरक्षण मिळाले तर गुलाल उधळण्यास मुंबईत ( आझाद मैदान ) जाऊ, नाही मिळाले तर उपोषणास आझाद मैदानावर जाऊ यावर ठाम असणारे जरांगे यांनी मुंबईच्या वेशीवरूनच पळ काढला.

याविषयी पत्रकारांनी विचारले असता, आम्ही आमचे बघू असे म्हणतात. तुम्ही म्हणाल तसे होणार नाही. मुळात जरांगे यांनीच आझाद मैदानावर जाण्याचा हट्ट धरला होता. असे अचानक काय झाले की, जरांगे यांनी आंदोलनाची दिशा बदलली.

जरांगेंनी आपल्या सगळ्या मागण्या मान्य झाल्याचे सांगत, उपोषण मागे घेतांना आंदोलकांनवरील गुन्हे मागे घेतल्याचे सांगितले. जरांगे सर्व मागण्या मान्य करत असल्याचा दावा करत असले तरी, प्रत्यक्षात जरांगे यांची मागणी सरकारने मान्य केलेली नाही.

ज्या मागण्या मान्य केल्याचा दावा जरांगे करतात त्या मागण्या पूर्वीपासून मान्य आहेत. वडीलांकडील नात्यात कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची पद्धत ही जुनीच आहे. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मराठा समाजाची मागणी सरकारने पूर्ण केलेलीच नाही.

जरांगे यांनी सरकारने नोकरी भरती करताना मराठ्यांच्या जागा सोडून भरती करावी अशी मागणी केली होती. परंतू असाही कुठे निर्णय झालेला नाही. मराठा समाजाने देव मानलेल्या जरांगे (Manoj Jarange ) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाची थेट फसवणूक केल्याचे चित्र आहे.

आरक्षणप्रकरणी सरकारची भूमिका स्पष्ट नसून सरकारने फक्त एक अधिसूचना काढलेली आहे व त्यावर हरकती मागवल्या आहेत. सरकारने आरक्षणासंदर्भात अध्यादेश किंवा शासन निर्णय (GR) काढलेला नाही. खोटे बोलून संभ्रम तयार करून मराठा समाजाची फसवणूक सरकारने केलेली आहे.

gr 1 1

मागील महिनाभरापासून ४० लाखाच्या वर कुणबी नोंदी सापडल्याचे सरकार सांगत आहे.ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना त्वरित कुणबी प्रमाणपत्राचे वाटप केले जाईल, असेही सांगण्यात आलेले आहे. मात्र प्रत्याक्षात हजारांचा आकडाही पार न केल्याचा संशय व्यक्त होत आहे.

मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र आणि सोयऱ्यांनाही हे कुणबी प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही हे स्पष्ट झाले आहे, तसेच मराठा आंदोलकांवरील गुन्हे ही सरकार मागे घेणार नसल्याचे स्पष्ट चित्र आहे.

मराठा समाज आज गुलाल उधळून आणि पेढे वाटून आनंद साजरा करताना दिसून येत आहे. यावर मराठा आरक्षणाचे अभ्यासक पत्रकार अतुल पाटील म्हणतात,” आरक्षण नावाचे पेढे अनेक जातीचे लोक कैक वर्ष बिनबोभाट खात आहेत. मराठेच असे आहे कि, आरक्षण मिळाले म्हणून दर दोन वर्षांनी पेढे खातात. लाजा वाटू देत..

पुढे ते म्हणतात, मनोज जरांगे पाटील हे आजही प्रामाणिक आहेत. तीच त्यांची ताकत आहे. लढा कायम ठेवावा. पण यापुढे फसू नये. एवढेच. मराठ्यांना आरक्षण मिळाले नाही, हे वास्तव मान्यच करावे लागेल.

वाशीत कालच आंदोलनस्थळी १५ गाड्या गुलाल कुणी आणून ठेवला होता. तो गरजवंत मराठ्याने आणला असेल तर अभिनंदन. आणि सरकारपुरस्कृत माणसाने पुरवला असेल तर, हा दगाफटका ठरवून केला आहे. असाच निष्कर्ष निघत असल्याचे मत अतुल पाटील यांनी व्यक्त केले आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.