Manoj Jarange यांनी मराठा समाजाला फसवले? आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे नाहीत

Manoj Jarange cheated the Maratha community? मराठा आंदोलकांनवरील गुन्हे मागे नाहीत

Manoj Jarange । बीड । मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी अंतरवाली सराटी  येथे उपोषण आंदोलन सुरू केले होते. जरांगेनी काल आश्चर्यकारक उपोषण मागे घेतांना आंदोलकांनवरील गुन्हे मागे घेतल्याचे सांगितले.

परंतु मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनात घर जाळणे, हल्ला करणे, सरकारी मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यात येणार नाहीत, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी दिली.

Manoj Jarange cheated the Maratha community?

त्यामुळे मनोज जरांगे मराठा समाजाची खोटे बोलून फसवणूक करत असल्याचे चित्र समोर येत आहे. सरकारने आपल्या सगळ्या मागण्या मान्य केल्याचे सांगत मनोज जरांगे यांनी काल आश्चर्यकारक आंदोलन मागे घेतले.

मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावे आणि त्यांच्या सोयऱ्यांनाही हे कुणबी प्रमाणपत्र ग्राह्य धरावे या प्रमुख मागण्या घेऊन जरांगे मुंबईला निघाले होते. त्यांच्या मागण्या मान्य झाल्या असल्याचे जरांगे सांगत असले तरी प्रत्यक्षात मराठा समाजाने देव मानलेल्या जरांगे (Manoj Jarange ) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाची थेट फसवणूक केल्याचे चित्र आहे.

सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मराठा समाजाची मागणी सरकारने पूर्ण केलेलीच नाही. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र आणि सोयऱ्यांनाही हे कुणबी प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही हे स्पष्ट झाले आहे, तसेच मराठा आंदोलकांवरील गुन्हे ही सरकार मागे घेणार नसल्याचे स्पष्ट चित्र आहे.

आरक्षणप्रकरणी सरकारची भूमिका स्पष्ट नसून सरकारने फक्त एक अधिसूचना काढलेली आहे व त्यावर हरकती मागवल्या आहेत. सरकारने आरक्षणासंदर्भात अध्यादेश किंवा शासन निर्णय (GR) काढलेला नाही.

Devendra Fadnavis comment On Maratha Reservation Protestors

घर जाळणे किंवा सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे हे गुन्हे मागे घ्यायचे असतील तर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यामुळे सरसकट सर्वच गुन्हे मागे घेण्यात आलेले नाहीत, असे फडणवीस ( Devendra Fadnavis )  यांनी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.