Maratha Reservation । आंदोलकांना फसविण्याचा सरकारचा डाव; एक चूक पडेल महागात

घाबरलेल्या सरकारकडुन मोर्चा फोडण्याचे प्रयत्न; मोर्चा रोखुन तर दाखवा आंदोलक आक्रमक

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Maratha Reservation |  छत्रपती संभाजीनगर : राजेभाऊ मोगल | आरक्षणाच्या प्रश्नाबाबत मनात संताप असला तरी शांततेच्या मार्गाने मुंबईकडे कूच करत असलेल्या लाखो मराठा बांधवांच्या आंदोलनाने सरकारची झोप उडाली आहे.

राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष वेधून घेणाऱ्या मोर्चाला सामोरे कसे जायचे, यामुळे मुंबईमध्ये मोठा गोंधळ उडाला तर.. असे अनेक गंभीर स्वरुपाचे प्रश्न सरकार समोर असल्याने वेगवेगळ्या माध्यमातुन मोर्चा फोडण्याच्या अंनुषगाने बातम्या पेरायला सुरुवात केली आहे. असे असताना दुसरीकडे आक्रमक झालेले आंदोलक आम्हाला रोखुन तर दाखवा असे म्हणत आव्हान देत आहेत.

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मागील तीन महिन्यापासून राज्यभरात आंदोलने सुरू आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या आंदोलनाला सरकारच्या शिष्टमंडळांनी भेटी देऊन केवळ गोंजारण्याचेच काम केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २० दिवसांचा अवधी मागीतला असता जरांगे पाटील यांनी ३० दिवस दिले होते. या ३० दिवसातही काहीही केले नसल्याने पुन्हा एकदा २० दिवस दिल्यानंतरही प्रमाणपत्र वाटप झाले नसल्याचा सरकारवर आरोप केला जात आहे.

Maratha Reservation | Marathas will not get Reservation, the Government is a liar

२० जानेवारी २०२४ पर्यंत मागण्या मान्य झाल्या नाही तर मुंबईत येणार, असा इशारा दिला होता. त्याप्रमाणे हा मोर्चा रवाना झाला आहे.  लाखोच्या संख्येने सहभागी असलेले मराठा आंदोलक आता मुंबईत आल्यानंतर आपली दाणादाण उडेल, मोठा गोंधळ उडेल, हे चित्र देशभरात जाईल, म्हणून आत्तापर्यंत आंदोलकांना ज्याप्रमाणे भुलवले, तीच खेळी सरकार पुन्हा एकदा खेळु पाहत आहे.

जरांगे पाटलांनी मुंबईच्या दिशेने कुच केल्यानंतर सरकार नेहमीप्रमाणे आम्ही मराठा समाजाचा सर्वे करायला सुरुवात केली, आम्ही हे करत आहोत, आम्ही ते करीत आहोत, असे सांगत भुलविण्याचे काम करीत आहेत.

सर्वे करायचाच होता तर, मग अडीच ते तीन महिने मराठा आंदोलकांना का झुलवत ठेवले, या अशा प्रतापामुळेच समाजाच्या आंदोलकांमध्ये संतापाची भावना निर्माण झालेली आहे.

दरम्यान, जरांगे पाटील आता कुणाचेही ऐकणार नाहीत. मुंबईत येतीलच, या भीतीपोटी तुम्ही लोणावळा येथेच गुलाल उधळा, निर्णय झालाच समजा, अशा प्रकारच्या बातम्या पेरायला सुरुवात झाली होती. या सर्व भुलथापा आहेत, यावर कुणीही विश्वास ठेवु नये, असे आवाहनही आंदोलक करीत आहेत.