IND vs ENG 2nd Test | इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी असा आहे भारतीय संघ

IND vs ENG 2nd Test | इंग्लंड क्रिकेट टीम 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे.

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IND vs ENG 2nd Test | इंग्लंड 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. भारताला इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पराभूत व्हावं लागलं. इंग्लंडने टीम इंडियावर मात करत चौथ्याच दिवशी विजय मिळवला होता.

त्यानंतर आता दुसऱ्या कसोटीत केएल राहुल आणि आणि ऑलराउंडर रवींद्र जडेजा खेळणार नाही आहेत. अगोदरच विराट कोहली कौटुंबिक कारणामुळे उपलब्ध नाही. विराटच्या जागी रजत पाटीदार खेळणार आहे.

रवींद्र जडेजाला पहिल्या कसोटीत चौथ्या दिवशी मैदानात दुखापत झाली. यामुळे जडेजा दुसऱ्या कसोटीतुन बाहेर पडला. जडेजाने पहिल्या कसोटी सामन्यात 89 धावा आणि 5 विकेट्स घेतल्या आहेत.

दुसरा कसोटी सामना 2 ते 6 फेब्रुवारी दरम्यान विशाखापट्टणम येथे होणार आहे. दुसऱ्या कसोटी साठी सरफराज खान, सौरभ कुमार आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा समावेश करण्यात आला आहे.

Ind Vs Eng 2nd Test Match Details

टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आवेश खान, रजत पाटीदार, सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर आणि सौरभ कुमार.

इंग्लंड टीम | बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टली, मार्क वुड, जॅक लीच, ऑली रॉबिन्सन, जेम्स अँडरसन, डॅनियल लॉरेन्स आणि गस ऍटकिन्सन.

महत्वाच्या बातम्या