Maratha Reservation | पितृसत्ताक पद्धतीने सगेसोयऱ्यांना दाखले देण्याची योजना जुनीच

The patriarchal system of giving certificates is old

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Maratha Reservation  मुंबई : मराठा आरक्षणासाठी शासनाने अधिसूचनेच्या मसुद्यात पितृसत्ताक पद्धतीत सगेसोयऱ्यांना कुणबी ( Kunbi caste certificate ) दाखले देण्याची तरतूद केली असली तरी ही  प्रचलित पद्धत आहे.

या संदर्भात २००१ मध्ये कायदा करण्यात आला असून, २०१७ मध्ये सरकारने या संदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध केली होती. यामुळेच शासकीय अधिसूचनेत नवीन काय, असा सवाल व्यक्त केला जात आहे.

मसुद्यात पितृसत्ताक पद्धतीत रक्त नातेसंबंधातील पुरावा आढळल्यास कुणबी जात प्रमाणपत्र ( Kunbi caste certificate ) देण्याची तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद सध्याही लागू आहे.

मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मराठा समाजाची मागणी सरकारने पूर्ण केलेलीच नाही. ज्या मागण्या मान्य केल्याचा दावा जरांगे करतात त्या मागण्या पूर्वीपासून मान्य आहेत.

Maratha Reservation । The patriarchal system of giving certificates is old

राज्यात २००१ पासून या कायद्याची अंमलबजावणी सुरू आहे. या कायद्याच्या अनुच्छेद १८ (१) नुसार राज्य सरकारने नियम तयार केले असून १४ नोव्हेंबर २०१७ रोजी त्यासंबंधीची अधिसूचना प्रसृत करण्यात आली आहे.

त्यात पडताळणी समितीने दिलेले अर्जदाराच्या रक्तसंबंधातील वडिलांचे किंवा सख्ख्या चुलत्याचे किंवा वडिलांकडील रक्तसंबंधातील (पितृसत्ताक पद्धत) इतर कोणत्याही नातेवाईकांचे वैधता प्रमाणपत्र उपलब्ध असल्यास तो महत्त्वाचा पुरावा मानून सक्षम प्राधिकाऱ्याने जातीचे प्रमाणपत्र निर्गमित करावे, अशी तरतूद आहे.

हत्वाच्या बातम्या