नवरा शारीरिक सुख देत नाही म्हणून पत्नीची पोलीस ठाण्यात तक्रार

Wife complains to police station as husband is not giving physical pleasure

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Husband Cant Sex With Wife | एका 32 वर्षीय महिलेनं आपला नवरा शारीरिक सुख देत नसल्याच्या कारणामुळे खडकपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी 40 वर्षीय पती नपुसंक असल्याची तक्रार दाखल करून घेतली आहे. बायकोला शारीरीक सूख देऊ शकत नाही हे माहिती असूनही पतीने महिलेला माहिती दिली नसल्याचे आणि लग्न करुन आपणास शारीरीक सुखापासून वंचित ठेवलेचे तक्रारीत म्हंटले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 32 वर्षीय तक्रारदार महिला ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एका दुर्गम असलेल्या गावात राहते. तिचे लग्न कल्याण पश्चिम मधील शहाड येथील 40 वर्षाच्या तरूणाबरोबर जून २०२३ मध्ये झाले होते.

लग्नापूर्वी महिलेच्या नातेवाईकांनी, तुम्ही विवाहासाठी ४० वर्ष होऊन सुध्दा का थांबले, असा प्रश्न विचारला असता, त्यावेळी पतीने सरकारी नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात होतो, म्हणून लग्नाला उशीर झाल्याचे सांगितले.

Husband Cant Sex With Wife Mumbai News

जून २०२३ मध्ये यांचे लग्न नाशिक जवळील इगतपुरी भागात थाटामाटात पार पडले होते. नवरा शिकलेला आहे म्हणून महिलेने त्याला पसंत केल्याचे सांगितले.

मात्र लग्नानंतर नवरा विक्षिप्तपणे वागत असल्याचं महिलेच्या निदर्शनास आलं. नवऱ्यामध्ये काहीतरी दोष आहेत हे या महिलेलं समजलं. यामुळे ती अस्वस्थ झाली आणि आपल्या माहेरी निघून गेली.

Wife complains to police station as husband is not giving physical pleasure

सासरच्या मंडळींच्या विनंतीवरून महिला माहेरी परत आली. यावेळी तिला नवऱ्यामधील दोष प्रकर्षानं दिसून आले. तो डॉक्टरांकडून काहीतरी औषधं घेत असल्याचंही लक्षात आले. तिने यासंबंधी डॉक्टरांकडे विचारणा केली असता, डॉक्टरांनी नवऱ्यामध्ये काही भावनिक दोष असल्याचं सांगितलं.

यानंतर महिलेने नवरा नपुंसक असून त्याच्याकडून आपल्याला कधीही शारिरीक सुख मिळणार नाही, हे समजल्यावर विश्वासघात आणि फसवणूक केल्याची तक्रार महिलेने खडकपाडा पोलीस ठाण्यात दाखल केली. आता या प्रकरणी महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. एन. घस्ते पुढील तपास करत आहेत.

महत्वाच्या बातम्या