Thursday - 19th May 2022 - 8:30 PM
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
No Result
View All Result

आव्हानांच्या अंगाखांद्यावर खेळत आणि आव्हानांना लोळवतच शिवसेना मोठी झाली- संजय राऊत

by shivani
Wednesday - 22nd December 2021 - 9:01 AM
Sanjay Raut आव्हानांच्या अंगाखांद्यावर खेळत आणि आव्हानांना लोळवतच शिवसेना मोठी झाली संजय राऊत

Sanjay-Raut-criticizes-BJP

FacebookTwitterWhatsAppTelegramEmail

मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना महाराष्ट्रात येऊन मन मोकळे करण्याचा पूर्ण अधिकार आहे. देशभरात भाजपविरोधकांचे बोलण्याचे स्वातंत्र्य दडपले असले तरी महाराष्ट्रात सगळ्यांचेच स्वातंत्र्य अबाधित आहे. त्यामुळेच शहा यांनी कारण नसताना जुन्या खपल्या पुन्हा खाजवल्या आहेत. शिवसेनेने सत्तेसाठी दगाबाजी केली व आता हिंमत असेल तर एकटे लढून दाखवावे असे आव्हान त्यांनी दिले. शहांचे नेमके वय किती ते माहीत नाही. पण आव्हानांच्या अंगाखांद्यावर खेळत आणि आव्हानांना लोळवतच शिवसेना मोठी झाली आहे. असा खोचक टोला शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी समान अग्रलेखातून लगावला आहे.

भारतीय जनता पक्षाचे बोट धरायला कोणी तयार नव्हते तेव्हा त्या एकटेपणातून त्यांना बाहेर काढून खांद्यावर गावभर मिरविणारी शिवसेनाच आहे. पुन्हा शहा यांना अलीकडच्या घडामोडींचाच विसर पडलेला दिसतोय. 2014 साली ते स्वतः अध्यक्ष असतानाच त्यांनी हिंदुत्ववादी शिवसेनेशी नाते तोडले होते. तेव्हा शिवसेना एकटय़ानेच लढली होती. शिवसेनेला एकटय़ाने लढण्याची, अंगावर येणाऱ्यांना शिंगावर घेऊन लोळविण्याची सवय आहे व लढण्यासाठी शिवसेनेला तपास यंत्रणांची ‘चिलखते’ वापरावी लागत नाहीत. शिवसेनेच्या हाती सत्याची वाघनखे आहेत. याचा अनुभव देशातील अनेकांनी वेळोवेळी घेतला आहे.

अमित शहा यांचा संताप समजण्यासारखा आहे. प्रयत्नांची शर्थ करूनही ते महाराष्ट्रातील ‘तीन चाकी’ सरकारचे टायर पंक्चर करू शकलेले नाहीत. केंद्रीय गृहमंत्र्यांचे म्हणणे आहे, ‘राज्यातील सरकार तीन चाकी रिक्षा आहे. रिक्षा आता बंद पडली आहे. हे विधान हास्यास्पद आणि गोरगरीबांचा अपमान करणारे आहे. मोदींच्या सरकारने पेट्रोल-डिझेलचे भाव शंभरावर नेऊन ठेवल्यामुळे सामान्यांना फक्त रिक्षाच परवडू शकते. महाराष्ट्राच्या सरकारला निदान तीन चाके तरी आहेत. केंद्रातले सरकार म्हणजे उताराला लागलेली गाडी आहे. २०२४ साली या गाडीचे ब्रेक निकामी झाल्याशिवाय राहणार नाहीत असे देशाचे वातावरण बदलताना दिसत आहे. असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.

शिवसेना महाराष्ट्राच्या सत्तेची सूत्रधार आहे या पोटदुखीतून फालतूच्या टिकाटिपण्या सुरू आहेत. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचे वैफल्य समजण्यासारखे आहे, पण देशाचे गृहमंत्रीही त्याच वैफल्यातून बोलू लागतात तेव्हा आश्चर्य वाटते. महाराष्ट्र सरकारला अडचणीत आणण्याची, असहकार पुकारण्याची एकही संधी केंद्रीय गृहमंत्रालय सोडत नाही. शिवसेनेला सत्तेची हाव आहे व भाजप मात्र त्याबाबत सोवळ्यात आहे, सत्ता दिसली की, भाजप रोज एकादशीचे क्रत पाळतो, असे त्यांना म्हणायचे आहे. ते खरे असेल तर पहाटेच्या शपथविधीचा राजभवनातील ‘सत्ता नारायण’ कोणी बांधला होता? त्यामुळे सत्य नारायण कोणाचा व सत्ता नारायणवादी कोण याचे बिंग तेव्हाच फुटले होते. असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

  • हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस; विविध मुद्यांवरुन भाजपा ठाकरे सरकारला घेरणार?
  • “अमित शहा मस्त असले तरी त्यांचे महाराष्ट्रातील चेले हे महामस्त आहेत”
  • ‘शिवसेनेला पोकळ आव्हाने देण्यापेक्षा लडाखमध्ये घुसलेल्या चिन्यांशी लढून दाखवा’
  • .तर यंदा औरंगाबादेतील क्रांती चौकात थाटात साजरी होणार शिवजयंती
  • बदनापूर नगर पंचायतीत बाचाबाचीचे रुपांतर मारहाणीत; आ. नारायण कुचे-संतोष सांबरेत हमरीतुमरी..!

ताज्या बातम्या

Somaiya is a perverted man dont follow his advice Sanjay Rauts beating आव्हानांच्या अंगाखांद्यावर खेळत आणि आव्हानांना लोळवतच शिवसेना मोठी झाली संजय राऊत
Editor Choice

“सोमय्या विकृत माणूस आहे, त्याच्या नादाला लागू नका”; संजय राऊतांचा घणाघात

Shiv Sena leader Sanjay Raut had dinner with Ravi Rana in Ladakh Shivsainik angry आव्हानांच्या अंगाखांद्यावर खेळत आणि आव्हानांना लोळवतच शिवसेना मोठी झाली संजय राऊत
Editor Choice

शिवसेनेचे फायरब्रॅण्ड नेते संजय राऊत राणांच्या पंगतीत; शिवसैनिकांनी फक्त लाठ्या खायच्या का?

Jitendra Awhad आव्हानांच्या अंगाखांद्यावर खेळत आणि आव्हानांना लोळवतच शिवसेना मोठी झाली संजय राऊत
Maharashtra

“…प्रश्नाने मला रात्रभर अस्वस्थ केले”, जितेंद्र आव्हाडांचे मोठे वक्तव्य

Navjot Singh Sidhu आव्हानांच्या अंगाखांद्यावर खेळत आणि आव्हानांना लोळवतच शिवसेना मोठी झाली संजय राऊत
India

नवजोत सिंह सिद्धू यांना मोठा धक्का; ‘त्या’ प्रकरणी सुप्रीम कोर्टाने सुनावली एक वर्षाची शिक्षा

महत्वाच्या बातम्या

IPL 2022 timing change of ipl 2022 final know at what time match will be played आव्हानांच्या अंगाखांद्यावर खेळत आणि आव्हानांना लोळवतच शिवसेना मोठी झाली संजय राऊत
IPL 2022

IPL 2022 : ऐकलं का! आयपीएल फायनलची वेळ बदलली; कोणत्या वेळेत होणार? जाणून घ्या!

आव्हानांच्या अंगाखांद्यावर खेळत आणि आव्हानांना लोळवतच शिवसेना मोठी झाली संजय राऊत
Entertainment

ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग मिळाल्याच्या दाव्यावर कंगना रणौतने दिली प्रतिक्रिया, म्हणाली…  

IPL 2022 Final Set To Be Played From 8 PM IST आव्हानांच्या अंगाखांद्यावर खेळत आणि आव्हानांना लोळवतच शिवसेना मोठी झाली संजय राऊत
Editor Choice

IPL 2022 : हे कळलं का..? फायनल मॅचबाबत BCCIनं केलाय ‘एक’ बदल; वाचा!

IPL 2022 RCB vs GT Toss and Playing 11 report आव्हानांच्या अंगाखांद्यावर खेळत आणि आव्हानांना लोळवतच शिवसेना मोठी झाली संजय राऊत
Editor Choice

IPL 2022 RCB vs GT : हार्दिक पंड्यानं जिंकला टॉस; गुजरात संघात ‘तेजतर्रार’ खेळाडूचं कमबॅक!

IPL 2022 young player in team well played who is your favourite आव्हानांच्या अंगाखांद्यावर खेळत आणि आव्हानांना लोळवतच शिवसेना मोठी झाली संजय राऊत
IPL 2022

IPL 2022 : यंदाच्या आयपीएल हंगामात ‘या’ युवा खेळाडूंनी गाजवले मैदान; तुमचा आवडता खेळाडू कोणता?

Most Popular

They take the name of Rama and behave like horror Aim at Fadnavis from match headline आव्हानांच्या अंगाखांद्यावर खेळत आणि आव्हानांना लोळवतच शिवसेना मोठी झाली संजय राऊत
News

“नाव रामाचे घेतात अन् बिभीषणाप्रमाणे वागतात”; सामना अग्रलेखातून फडणवीसांवर निशाणा

Somaiya is a perverted man dont follow his advice Sanjay Rauts beating आव्हानांच्या अंगाखांद्यावर खेळत आणि आव्हानांना लोळवतच शिवसेना मोठी झाली संजय राऊत
Editor Choice

“सोमय्या विकृत माणूस आहे, त्याच्या नादाला लागू नका”; संजय राऊतांचा घणाघात

आव्हानांच्या अंगाखांद्यावर खेळत आणि आव्हानांना लोळवतच शिवसेना मोठी झाली संजय राऊत
Editor Choice

“वाघांचे फोटो काढले म्हणून वाघ होता येत नाही तर…” – देवेंद्र फडणवीस

IPL 2022 kl rahul feels paid more due to this reason after lucknow super giant vs kolkata knight riders thrilling 2 run win आव्हानांच्या अंगाखांद्यावर खेळत आणि आव्हानांना लोळवतच शिवसेना मोठी झाली संजय राऊत
IPL 2022

IPL 2022 : आयपीएल लिलावात १७ कोटी मिळूनही ‘या’ संघाच्या कर्णधाराने केली मानधनवाढीची मागणी; वाचा!

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

© 2022 ENRICH MEDIA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ

© 2022 ENRICH MEDIA Powerd by ENRICH MEDIA