Sandipan Bhumre | पंढरपूर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपली इच्छा व्यक्त केली. मला विरोधी पक्षनेते पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, असं अजित पवार जाहीर कार्यक्रमात म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर संदिपान भुमरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांच्या पोटात काहीच राहत नाही, असं संदिपान भुमरे म्हणाले आहे.
Ajit Pawar looks upset – Sandipan Bhumre
संदिपान भुमरे म्हणाले, “गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार नाराज दिसत आहे. त्यांच्या बोलण्यातून त्यांची नाराजी दिसत आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना कार्याध्यक्ष केल्यामुळे देखील ते नाराज आहेत. मात्र, तो त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे. पण पोटातलं ओठावर येणारच आणि अजित पवार यांच्या पोटात काहीच राहत नाही.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “शिंदे-फडणवीस सरकार पडेल, हे स्वप्न फक्त संजय राऊत (Sanjay Raut) यांना पडतं. आपले 16 लोक टिकवून ठेवण्यासाठी संजय राऊत हे बोलत असतात. मात्र, 2024 पर्यंत हे सरकार टिकणार आहे आणि पुढे सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वाखाली हे सरकार येणार आहे.
दरम्यान, काल (21 जुन) अजित पवार यांनी खळबळ जनक वक्तव्य केलं आहे. “मला विरोधी पक्षनेते पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा. मात्र, आमदारांच्या आग्रहाखातर मी हे पद स्वीकारलंआहे. जवळपास एक वर्षापासून मी विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी सांभाळत आहे. आता मला यातून मुक्त करा”, असं अजित पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- Manisha Kayande | ऊबाठा गटातील शिवसैनिकांना मविआ कधीच आवडली नाही – मनीषा कायंदे
- Nana Patole | वेदांता, फॉक्सकॉन घालवला आता मायक्रॉन तरी महाराष्ट्र घेऊन या; नाना पटोलेंचं CM शिंदेंना पत्र
- Chhagan Bhujbal | जयंत पाटलांना मिळणार डच्चू? राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष पदासाठी छगन भुजबळ इच्छुक
- Jitendra Awhad | “… म्हणून 50 खोके आमच्या डोक्यात बसले आहे”; गुलाबराव पाटलांना जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
- IND vs WI | शतकांमागून शतकं ठोकूनही शुभमन गिलला राहावं लागणार टी-20 मालिकेतून बाहेर?