Manisha Kayande | मुंबई: मुंबई महानगरपालिका कोविड घोटाळा प्रकरणी ईडीनं आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या निकटवर्तीयांवर धाड टाकली आहे. या प्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला. सुडाच्या भावनेनं ही कारवाई सुरू आहे, असं संजय राऊत म्हणाले. संजय राऊत यांच्या या प्रतिक्रियेला मनीषा कायंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
मनीषा कायंदे (Manisha Kayande) म्हणाल्या, “ईडीने धाडी टाकायला सुरुवात केली आहे. ईडीच्या या प्रक्रियेला सामोरे जायला काय हरकत आहे. या प्रक्रियेमध्ये जर कोणी दोषी आढळलं तर त्यांना घाबरायला हवं. मात्र तुम्ही अगोदरच आरडा-ओरडा सुरू केला आहे.”
Sanjay Raut’s language is causing damage to the ubata group – Manisha Kayande
पुढे बोलताना त्या (Manisha Kayande) म्हणाल्या, “संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या भाषेमुळे ऊभाटा गटाचं नुकसान होतं आहे. त्यामुळे आम्हाला उद्धव ठाकरे यांची काळजी वाटते. ऊभाटा गटातील शिवसैनिकांना महाविकास आघाडी कधीच आवडली नाही. त्यांनी जनादेशाचा अपमान करून महाविकास आघाडी स्थापन केली आहे.”
दरम्यान, कोविड घोटाळ्यावरून सुरू असलेल्या ईडी चौकशीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली होती. संजय राऊत म्हणाले, “सुडाच्या भावनेने ही कारवाई सुरू आहे. देवेंद्र फडणवीस नाकाने भ्रष्टाचाराचे कांदे सोलतात. सरकारला जर खरच भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करायची असेल तर त्यांनी आपल्या घरापासून साफसफाई करायला सुरुवात करावी.”
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal | जयंत पाटलांना मिळणार डच्चू? राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष पदासाठी छगन भुजबळ इच्छुक
- Jitendra Awhad | “… म्हणून 50 खोके आमच्या डोक्यात बसले आहे”; गुलाबराव पाटलांना जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
- IND vs WI | शतकांमागून शतकं ठोकूनही शुभमन गिलला राहावं लागणार टी-20 मालिकेतून बाहेर?
- Micron Investment | तरुणांना मिळणार नव्या रोजगाराच्या संधी! केंद्र सरकारकडून सुमारे 300 कोटीच्या प्रकल्पाला मंजुरी
- WhatsApp | व्हाट्सॲप वापरकर्त्यांसाठी गुड न्यूज! व्हाट्सॲपनं लॉन्च केलं चॅट लॉक फीचर