Nana Patole | वेदांता, फॉक्सकॉन घालवला आता मायक्रॉन तरी महाराष्ट्र घेऊन या; नाना पटोलेंचं CM शिंदेंना पत्र

Nana Patole | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र राज्य परदेशी गुंतवणूक करण्यासाठी पहिल्या क्रमांकावर असलं तरी गेल्या वर्षी वेदांता, फॉक्सकॉन यांसारखे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले. अशात केंद्र सरकारने अमेरिकन कंपनी मायक्रॉनला भारतामध्ये 2.7 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्यासाठी परवानगी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात यावर शिक्का मोर्तब होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पत्र लिहिलं आहे.

या पत्रात नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, “महाराष्ट्र राज्य औद्योगिक दृष्ट्या प्रगतशील आहे. वेदांता, फॉक्सकॉन इत्यादी मोठ्या प्रकल्पांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी तयारी दर्शवली होती. मात्र, हे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले. त्यामुळे राज्याला मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावं लागलं. त्यामुळं आता मायक्रॉन तरी महाराष्ट्रामध्ये येऊ द्या.”

The environment in Pune area is favorable for Micron project – Nana Patole

पुढे ते (Nana Patole) म्हणाले, “मायक्रॉन प्रकल्पासाठी महाराष्ट्रातील पुणे परिसरात अत्यंत अनुकूल वातावरण आहे. त्याचबरोबर पुणे हे औद्योगिक क्लस्टर आहे. रस्ते वाहतूक, विमानतळ, बंदरे सर्व सुविधा पुण्यात आहे. त्याचबरोबर या प्रकल्पासाठी लागणारे मनुष्यबळ आणि आवश्यक सोयी पुण्यामध्ये उपलब्ध आहे. वेदांता आणि फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं होतं. हे नुकसान भरून काढण्यासाठी मायक्रॉन हा प्रकल्प महाराष्ट्रात यायला हवा आणि यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रयत्न करायला हवे.”

“वेदांता आणि फॉक्सकॉन हे दोन्ही प्रकल्प महाराष्ट्रात येणार होते. या प्रकल्पाच्या माध्यमातून 1.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार होती. मात्र, हे प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्राला नुकसान सहन करावं लागलं आहे. ते नुकसान भरून काढण्यासाठी मायक्रॉन प्रकल्प महाराष्ट्रात यायला हवा”, असही ते (Nana Patole) या पत्रात म्हणाले आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.