संदीपान भुमरेंना भाजपचा मोठा झटका? जलील निवडून येणार असेल तर खैरेंना मदत?

इम्तियाज जलील

sandipan bhumre । छत्रपती संभाजीनगर । राज्यातील लोकसभेच्या ४ टप्पातील मतदानाला काही दिवस शिल्लक असताना भाजपच्या अंतर्गत भेटीगाठी वाढल्या आहेत. संभाजीनगर मध्ये लोकसभा लढवण्यासाठी भाजप इच्छुक होते पण शिंदे गटाच्या आक्रमकते समोर भाजपला झुकावे लागले होते. आणि महायुतीचे उमेदवार म्हणून शिंदे गटाच्या मंत्री संदीपान भुमरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

दुसरीकडे ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे, MIM पक्षाकडून विद्यमान खासदार इम्तियाज जलील निवडणुकीच्या मैदानात आहे. वरकरणी ही निवडणूक तिरंगी वाटत असली तरी प्रमुख लढत ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट यांच्यात रंगणार आहे. असे असले तरी भुमरे यांचे शहरात आणि गावखेड्यात प्रभाव कमी आहे. पण भाजपचा पारंपरिक मतदार असलेला OBC समाजामुळे भुमरे यांना मोठे मते मिळतील अशी शक्यता नाकारता येत नाही.

परंतु, २०१९ च्या लोकसभेत चंद्रकांत खैरे विरुद्ध इम्तियाज जलील विरुद्ध हर्षवर्धन जाधव यांच्यात लढत झाली, त्यात जलील विजयी झाले होते. यावेळी तसे होईल याची भीती भाजपच्या नेत्यांकडून व्यक्त होत आहे. भाजपच्या अंतर्गत सर्व्हेत संदीपान भुमरे हे पराभूत होतील अशी माहिती होती, तरी देखील शिंदे गटाकडून भुमरे यांना उमेदवारी देण्यात आली.

भुमरे विरुद्ध खैरे यांच्या भांडणात जलील निवडून येतील अशी भीती भाजपच्या स्थानिक नेत्यांना वाटते. जलील निवडून न यावेत म्हणून सर्वोतपरी भाजपकडून प्रयत्न होत आहेत. जलील यांना पराभूत करायचे असेल तर खैरे यांना गुप्त मदत भाजपकडून होण्याची शक्यता आहे.

संदीपान भुमरे हे मराठा असल्याने आणि भाजप नेते भागवत कराड यांना लोकसभेतील उमेदवारी न दिल्याने OBC समाज नाराज असल्याच्या देखील चर्चा आहेत. दुसरीकडे विनोद पाटील खैरे यांना मदत करत असल्याची मोठी चर्चा आहे. त्यामुळे भुमरे यांचा विजयी मार्ग कठीण आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.